donald trump Dainik Gomantak
ग्लोबल

Donald Trump Warning: इराणला शस्त्रे दिल्यास चीन अन् रशियाची खैर नाही, डोनाल्ड ट्रम्पचा महाभयंकर इशारा; युरोपियन युनियनलाही घेतलं फैलावर

Trump Warning To China And Russia On Iran Arms: मध्यपूर्वेत इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि रशियाबाबत एक मोठे विधान केले.

Manish Jadhav

Trump Warning To China And Russia On Iran Arms: मध्यपूर्वेत इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि रशियाबाबत एक मोठे विधान केले. आपल्या 'ट्रूथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या दोघांनीही इराणला कोणत्याही परिस्थितीत शस्त्रे न विकण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच, जर चीन किंवा रशियाने या युद्धात हस्तक्षेप करुन इराणला मदत केली, तर ते त्यांच्यासाठी अत्यंत घातक ठरेल, असा थेट इशाराही ट्रम्प यांनी दिला.

ट्रम्प यांनी लिहिले की, बीजिंगमधील नुकत्याच झालेल्या भेटीत शी जिनपिंग यांनी चीन किंवा कोणतीही चिनी कंपनी इराणला शस्त्रे पुरवणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या संबंधांमुळे आपण यावर विश्वास ठेवत असल्याचे ट्रम्प म्हणाले. त्याचप्रमाणे, युक्रेन युद्धाच्या तणावानंतरही पुतिन यांनी इराणला शस्त्रे न विकण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. ट्रम्प म्हणाले की, अमेरिका युक्रेनला थेट शस्त्रे विकत नसून नाटो (NATO) देशांना विकते आणि ते त्यासाठी पूर्ण किंमत मोजतात. त्यामुळे इराणच्या मुद्द्यावर चीन आणि रशिया सध्या दूरच राहतील अशी आशा आहे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील.

इराण (Iran) युद्धासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन (EU) आणि नाटो देशांवरही जोरदार निशाणा साधला. युरोपियन युनियनने गुगल, ॲपल, मेटा आणि ॲमेझॉन यांसारख्या मोठ्या अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांवर चुकीच्या पद्धतीने आणि भेदभावाने अब्जावधी डॉलर्सचा अँटी-ट्रस्ट दंड ठोठावला असल्याचा आरोप त्यांनी केला. ट्रम्प यांच्या मते, गुगलवर 18 अब्ज डॉलर, ॲपलवर 15 अब्ज डॉलर, मेटावर 3 अब्ज डॉलर आणि ॲमेझॉनवर 2.5 अब्ज डॉलरचा दंड आकारण्यात आला. "अमेरिका म्हणजे युरोपसाठी कोणतीही 'पिग्गी बँक' (पैशांची गुल्लक) नाही आणि आम्ही ती बनू देणार नाही," असे ठणकावून सांगत ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवर नवीन टॅरिफ लादण्याची थेट धमकी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT