Donald Trump signs America First COVID 19 vaccine executive order 
ग्लोबल

कोरोना लसीकरणातही ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’

PTI

वॉशिंग्टन  : इतर देशांना मदत करण्याआधी अमेरिकेतील नागरिकांना लस मिळण्यात प्राधान्य देणाऱ्या अध्यादेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली. अमेरिकी नागरिकांना सर्वांत आधी लस मिळण्यासाठी गरज पडल्यास संरक्षण उत्पादन कायद्याचा (डीपीए) वापर करू, असेही ट्रम्प यांनी आज सांगितले.


ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली असताना अमेरिकेतही लवकरच लसीकरण मोहिम सुरु होण्याची शक्यता आहे. त्या दिशेकडे जाताना अध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकी नागरिकांना लसीकरण मोहिमेत प्राधान्य देणाऱ्या अध्यादेशावर सही केली. यामुळे इतर देशांना लस पुरविण्याच्या आधी अमेरिकी नागरिकांना पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. लसीचे पुरेसे उत्पादन होण्यासाठी ‘डीपीए’चा वापर करण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

या कायद्याच्या आधारे खासगी उत्पादकांना उत्पादन वाढविण्याचा आदेश देता येतो. अमेरिकेतच जगातील सर्वांत सुरक्षित आणि प्रभावी लस विकसीत होईल, असा विश्‍वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला. लस उत्पादनात वेग आणण्याच्या मोहिमेला ‘ऑपरेशन वार्प स्पीड’ असे नाव देण्यात आले आहे. ‘सर्व संभाव्य लसींच्या उत्पादनासाठी १४ अब्ज डॉलरचा निधी आधीच मंजूर केला आहे. याच निधीच्या बळावर काम करत फायझर आणि मॉडर्ना कंपन्यांनी आपली लस प्रभावी असल्याचे सांगितले आहे,’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT