Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

Hormuz Strait Blockade Conflict: "इराणला मातीत गाडू!" ट्रम्प यांना संताप अनावर, पाकिस्तानमार्गे पाठवलेला प्रस्ताव लावला धुडकावून; होर्मुजची नाकेबंदी कायम

Donald Trump Iran Proposal Reject: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला असून पाकिस्तानमार्गे पाठवलेला इराणचा नवीन प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला.

Manish Jadhav

Donald Trump Iran Proposal Reject: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला असून पाकिस्तानमार्गे पाठवलेला इराणचा नवीन प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला. हा प्रस्ताव वाचल्यानंतर ट्रम्प कमालीचे संतापले असून त्यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला. जर इराणने योग्य अटी मांडल्या नाहीत, तर अमेरिका कोणत्याही करारावर स्वाक्षरी करणार नाही. इराणने सामंजस्य दाखवून अण्वस्त्र करार करावा, अन्यथा अमेरिकन सैन्य बॉम्बहल्ले करुन इराणला मातीत गाडून टाकेल, अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी धमकी दिली.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, इराणने (Iran) पाठवलेल्या नवीन प्रस्तावामुळे मी अजिबात समाधानी नाही. इराणला करार तर करायचा आहे, मात्र त्यांच्या अटी आम्हाला मान्य नाहीत. या प्रस्तावात अनेक त्रुटी असून त्या स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत. आता इराणने योग्य प्रस्ताव घेऊन समोर यावे, अन्यथा त्यांना वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. चर्चेची ही प्रक्रिया खूप लांबत चालली असून इराणच्या भूमिकेमुळे कराराची शक्यता कमीच वाटत असल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराणने अमेरिकेला (America) होर्मुज सामुद्रधुनीबाबत विशेष प्रस्ताव पाठवला. अमेरिकेने होर्मुज सामुद्रधुनी खुली केल्यास अण्वस्त्र करारावर चर्चा करु, असे इराणचे म्हणणे आहे. याउलट, ट्रम्प यांची अट अशी आहे की, इराणने आधी अण्वस्त्र करार करावा, त्यानंतरच होर्मुजची नाकेबंदी हटवली जाईल. दरम्यान, या प्रस्तावाची बातमी समोर येताच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली, तरीही किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या वरच आहे.

दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे युद्ध थांबवण्यासाठी विविध देशांच्या संपर्कात आहेत. त्यांनी आतापर्यंत तुर्की, इजिप्त, कतार, सौदी अरब, इराक आणि अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करुन आपल्या प्रयत्नांची माहिती दिली. युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कल्लास यांनी देखील अराघची यांच्याशी चर्चा केली असून होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी सुरु असलेल्या राजनैतिक प्रयत्नांचा आढावा घेतला. मात्र, ट्रम्प यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे या राजनैतिक चर्चेला यश मिळणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mobor Crime News: मोबोर समुद्रकिनाऱ्यावर थरार: पूर्ववैमनस्यातून छत्तीसगडमधील तरूणाची हत्त्या

Goa weather: मान्‍सूनपूर्व पावसात 40 टक्‍क्‍यांनी वाढ; सलग दोन दिवस हजेरी, जनजीवन विस्‍कळीत

Bangladesh Road Accident: ईदच्या आनंदावर काळाचा घाला! बांगलादेशात प्रवाशांनी भरलेला ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू; पहाटे घडला थरारक अपघात

Goa Milk Price Hike: गोवा डेअरीचे दूध 2 रुपयांनी महागले! सोमवारपासून नवीन दर लागू , जनतेला महागाईचा फटका

Budh Gochar 2026: नोकरीत बढती अन् व्यवसायात बक्कळ पैसा! बुध गोचर बदलणार तीन राशींचं भाग्य; घरात येणार अलोट संपत्ती

SCROLL FOR NEXT