

म्हापसा: हणजूण परिसरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास हा प्रकार घडला.
शुक्रवारी मध्यरात्री १ च्या सुमारास या मुलीच्या पोटात तीव्र कळा येऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात प्राथमिक तपासणी सुरू असतानाच, तिला असह्य वेदना होऊ लागल्या. त्यानंतर ती स्वच्छतागृहात गेली असता, तिथेच तिची प्रसूती झाली. प्रसूतीदरम्यान तिची आई तिच्यासोबत होती. या मुलीने एका बाळाला जन्म दिला.
मात्र, आई झालेली मुलगी अल्पवयीन असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट होताच, रुग्णालय प्रशासनाने तात्काळ हणजूण पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पीडित मुलगी आणि तिच्या पालकांचे जबाब नोंदवले. मात्र, याप्रकरणी प्रसूती झालेल्या अल्पवयीन माता किंवा तिच्या पालकांकडून पोलिसांना अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही.
दरम्यान, एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेत आहे. इतके महिने ती गरोदर असतानाही हा प्रकार तिच्या पालकांच्या अथवा शाळा प्रशासनाच्या निदर्शनास कसा आला नाही, याबद्दल पोलिसांनी तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे. या संवेदनशील प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.