Mormugao: मुरगाव नगरपालिकेचे स्वच्छता सर्वेक्षण पूर्ण, 25 प्रभागांचे मूल्यांकन, सर्वेक्षकांकडून स्वच्छतागृहाची तपासणी

Mormugao Swachh Bharat Survekshan: गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या ‘स्वच्छ भारत स्वच्छता सर्वेक्षण-२०२६’ अंतर्गत मुरगाव पालिका क्षेत्रातील स्वच्छता मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
Mormugao
Mormugao Swachh Bharat SurvekshanDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या ‘स्वच्छ भारत स्वच्छता सर्वेक्षण-२०२६’ अंतर्गत मुरगाव पालिका क्षेत्रातील स्वच्छता मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मंत्रालयाच्या प्रशिक्षित सर्वेक्षकांनी शहरातील विविध भागांना भेटी देऊन स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा यांचा सविस्तर आढावा घेतला.

या मूल्यांकनाच्या आधारे शहरांच्या अंतिम स्वच्छता क्रमवारीची घोषणा करण्यात येणार आहे.देशभरातील ४,५०० हून अधिक शहरांचा या सर्वेक्षणात समावेश असून मुरगाव पालिकेच्या २५ प्रभागांमधील स्वच्छतेसंबंधी विविध बाबींची तपासणी करण्यात आली. घरोघरी कचरा संकलन, कचऱ्याचे वर्गीकरण, सार्वजनिक स्वच्छतागृहे, घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था, ब्लॅक स्पॉट निर्मूलन आणि स्वच्छता पायाभूत सुविधांची स्थिती याबाबत माहिती संकलित करण्यात आली.

Mormugao
Sal Panchayat: साळमधील रस्त्यांवर मृत्यूचे सापळे? जलवाहिनीच्या कामामुळे उखडले रस्ते; पावसाळ्यात माती खचून मोठ्या अपघाताची भीती

मुरगाव पालिकेच्या सडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पासह घरोघरी कचरा गोळा करणाऱ्या यंत्रणेचीही पाहणी करण्यात आली. अरुंद रस्त्यांमधून कचरा संकलन सुलभ व्हावे यासाठी सीएसआर निधीतून खरेदी करण्यात आलेल्या लहान कचरावाहू वाहनांच्या वापराची नोंदही सर्वेक्षकांनी घेतली. तसेच घनकचरा व्यवस्थापन समितीच्या कार्यपद्धतीचा आणि नियमित बैठकीतून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचा आढावाही घेण्यात आला.

सर्वेक्षणादरम्यान व्यावसायिक क्षेत्रे, गृहनिर्माण संकुले, शाळा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, बाजारपेठा आणि औद्योगिक वसाहतींमधील स्वच्छता व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. चिकन व मटण बाजारातील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट, कचरावाहू वाहनांची उपलब्धता व कार्यक्षमता, तसेच नागरिकांकडून कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणी याबाबतही माहिती गोळा करण्यात आली.

Mormugao
Zambaulim Gulalotsav: जांबावली गुलालोत्सवासाठी 250 पोलीस तैनात! सुरक्षेचा पोलिस प्रशासनाकडून आढावा Watch Video

ब्लॅक स्पॉट्सची पडताळणी

पालिकेने उघड्यावर शौचविधी पूर्णपणे बंद करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, घरगुती व सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता, तसेच नष्ट करण्यात आलेल्या ब्लॅक स्पॉट्सवर करण्यात आलेले सुशोभीकरण यांचाही सर्वेक्षणात समावेश होता. स्वच्छतागृहांची माहिती देणारे दिशादर्शक फलक, स्वच्छता जनजागृती आणि इतर सुविधांच्या अंमलबजावणीची पडताळणीही करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com