Mollem Bribery Case: मोले चेकपोस्ट लाच प्रकरणाची चौकशी सुरू, व्हिडिओची दखल ; दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

Mollem Checkpost Bribery Video: मोले येथील चेकपोस्टवर पोलिस कर्मचारी लाच घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
Mollem checkpost bribery case latest news
Mollem checkpost bribery case latest newsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मोले येथील चेकपोस्टवर पोलिस कर्मचारी लाच घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी दिले आहेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश फोंडा उपविभागीय पोलिस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांना देण्यात आले आहेत. प्रभुदेसाई यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिली जात असून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Mollem checkpost bribery case latest news
Bank Robbery: 10 मिनिटात 7 कोटींचं सोनं आणि 5 लाखांची रोकड केली लंपास! झारखंडमध्ये बँकेवर दरोडेखोरांचा छापा; कर्मचारी-ग्राहकांना ठेवलं ओलीस

"या प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. उपअधीक्षकांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल," असे प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले.

कठोर कारवाईचा इशारा!

१२ जून रोजी सोशल मीडियावर मोले चेकपोस्टवरील पोलिस कर्मचारी लाच स्वीकारत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओतील दृश्यांची सत्यता आणि संबंधित कर्मचाऱ्यांची भूमिका तपासली जात आहे. चौकशीत आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रभुदेसाई यांनी दिला आहे. या घटनेमुळे पोलिस दलाच्या प्रतिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com