Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

Donald Trump: ‘’मी सत्तेत आलो तर त्यांना अमेरिकेतून हाकलून देईन’’, पॅलेस्टाईन समर्थकांवर भडकले ट्रम्प; दिली थेट धमकी

Manish Jadhav

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल आंतरराष्ट्रीय दबाव झुगारुन गाझावर हल्ले करत आहे. हमासला संपवण्याची शपथ घेतलेले इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू मागे हटायला तयार नाहीत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे.

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्यास कॉलेज कॅम्पसमध्ये सुरु असलेली पॅलेस्टिनी समर्थक निदर्शने रोखण्याचे आश्वासन दिले. अमेरिकेत 5 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. देशात 1912 नंतर प्रथमच विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि माजी राष्ट्राध्यक्ष यांच्यात लढत होणार आहे. उजव्या विचारसरणीचे नेते डोनाल्ड ट्रम्प इस्रायल-हमास युद्धात इस्रायलला पाठिंबा देण्याचे उघडपणे बोलले.

द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, या महिन्याच्या सुरुवातीला रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प ज्यू समुदयाच्या एका गटाला संबोधित करताना म्हणाले की, ते निवडून आल्यास कॉलेज कॅम्पसमधील पॅलेस्टिनी समर्थकांना अमेरिकेतून हाकलून देतील. या विद्यार्थी समर्थकांबाबत ट्रम्प म्हणाले की, ते ‘कट्टरपंथी क्रांती’चा भाग आहेत.

दुसरीकडे, गाझावरील इस्रायली कारवाईच्या विरोधात अमेरिकेत विद्यार्थी आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या निदर्शनांनी अमेरिकन सरकार पुरते हादरले आहे. आंदोलन दडपण्यासाठी अमेरिकन पोलिसांनी विद्यार्थ्यांवर धडक कारवाई केली. त्यांनी तब्बल 2,000 हून विद्यार्थ्यांना अधिक अटक केली. एप्रिलच्या मध्यात, कोलंबिया विद्यापीठात गाझा एकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी इस्रायली-संबंधित कंपन्यांचा निषेध करण्याचे आवाहन केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची लाट कॅलिफोर्निया, टेक्साससह इतर अनेक राज्यांमधील कॉलेज कॅम्पसमध्ये पसरली. विद्यापीठ प्रशासकांनी पॅलेस्टिनी समर्थक निदर्शकांवर सेमिटिक विरोधी भाषा वापरल्याचा आणि कॅम्पसमध्ये असुरक्षित वातावरण निर्माण केल्याचा आरोप केला. मात्र विद्यार्थ्यांनी ते आरोप फेटाळून लावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT