Donald Trump No War statement Iran response Dainik Gomantak
ग्लोबल

America Iran News: 'अमेरिकेची हवा निघाली'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'नो वॉर'च्या घोषणेवर इराणचा तगडा पलटवार VIDEO

Iranian Media Mocks Trump No War Announcement: आखाती देशांनी केलेल्या आवाहनामुळे आणि संपूर्ण क्षेत्रात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने लष्करी बळाचा वापर करण्याऐवजी राजनैतिक प्रयत्नांना प्राधान्य देण्याचे अमेरिकेने ठरवले.

Manish Jadhav

Iranian Media Mocks Trump No War Announcement: मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात प्रस्तावित असलेली मोठी लष्करी कारवाई तूर्तास रोखण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आखाती देशांनी केलेल्या आवाहनामुळे आणि संपूर्ण क्षेत्रात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने लष्करी बळाचा वापर करण्याऐवजी राजनैतिक प्रयत्नांना प्राधान्य देण्याचे अमेरिकेने ठरवले. तथापि, अमेरिकेच्या या घोषणेनंतर इराणमधील प्रसारमाध्यमांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकी प्रशासनाची जोरदार खिल्ली उडवत तिखट शब्दांत टीका केली.

ट्रम्प यांच्या या निर्णयाला इराणच्या सरकारी आणि निम-सरकारी प्रसारमाध्यमांनी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले. इराणी प्रसारमाध्यमांच्या मते, हा निर्णय ट्रम्प प्रशासनाचा रणनीतिक माघार असून अमेरिका प्रत्यक्षात लष्करी कारवाई करण्याच्या स्थितीत नव्हता, म्हणूनच वॉशिंग्टनला आता चर्चेचा मार्ग स्वीकारणे भाग पडले. इराणची प्रसिद्ध निम-सरकारी वृत्तसंस्था 'फार्स'ने यावर अत्यंत खोचक शब्दांत भाष्य करत, अमेरिकेने केवळ दबाव आणि बिकट परिस्थितीमुळेच आपला निर्णय बदलल्याचा आरोप केला. दुसरीकडे, ट्रम्प प्रशासन मात्र या निर्णयाला प्रादेशिक शांततेसाठी घेतलेले एक सकारात्मक पाऊल म्हणून जगासमोर मांडत आहे.

माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की, इराणविरुद्धच्या (Iran) या लष्करी कारवाईची सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि ही कारवाई दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी लष्करी कारवाई ठरु शकली असती. मात्र, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतार यांसारख्या मित्रराष्ट्रांनी थेट युद्धाऐवजी चर्चेद्वारे तोडगा काढण्याची आग्रही विनंती केली. सौदीच्या शाह आणि क्राउन प्रिन्स यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, युद्धाचे भयानक परिणाम आणि संपूर्ण क्षेत्रात निर्माण होणारा संभाव्य मानवतावादी दृष्टिकोन विचारात घेऊन ही कारवाई स्थगित करण्यात आल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

त्याचवेळी, तेहरानने अमेरिकेचे सर्व दावे फेटाळून लावले. अमेरिकेसोबत कुठल्याही कराराची चर्चा झाली नसल्याचे इराणच्या अधिकृत यंत्रणांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या अशाप्रकारच्या घोषणा अनेकदा पोकळ ठरल्याचा इतिहास असल्याने इराणने आपल्या लष्करी सुरक्षेत कोणतीही सूट दिलेली नाही. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतरही दोन्ही देशांमधील तणाव पूर्णपणे निवळलेला नसून, इराणने अत्यंत सतर्कतेची भूमिका घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT