Donald Trump Case Dainik Gomantak
ग्लोबल

Donald Trump Case: डोनाल्ड ट्रम्प यांची पॉर्न स्टार प्रकरणी सुटका

डोनाल्ड ट्रम्प यांंना सुनावणीअंती त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Donald Trump - Stormy Daniels Case: पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर आणि तिला अवाजवी फायदा मिळवून दिल्याबद्दल खटल्याला सामोरे जाणाऱ्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली होती.

ट्रम्प यांच्यावर 34 आरोप लावण्यात आले आहेत. न्यायालयाने त्यांना 1.22 लाख डॉलरचा दंडही ठोठावला आहे. हे पैसे अॅडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला दिले जाणार आहेत.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या सुनावणीदरम्यान तीन उदाहरणे देण्यात आली. पहिल्यात ट्रम्प टॉवरच्या सुरक्षारक्षकाला 30,000 डॉलर्स, महिलेला 150,000 डॉलर्स आणि तिसऱ्यात पॉर्न स्टारला 130,000 डॉलर्स देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

तसेच, न्यूज एजन्सी एएफपीनुसार, अमेरिकन न्यायाधीशांचे म्हणणे आहे की, ट्रम्प विरुद्धचा खटला जानेवारी 2024 पासून सुरू होऊ शकतो.

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळले 

हे प्रकरण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या काही दिवसापुर्वींचे आहेत. ऑक्टोबर 2016 च्या अखेरीस पॉर्न स्टार डॅनियल्सला त्याच्या तत्कालीन वैयक्तिक वकील मायकेल कोहेनच्या वतीने 130,000 US डॉलर्सचे पेमेंट केल्या संबंधित आहे.

एका दशकापूर्वी ट्रम्प यांच्याशी असलेल्या कथित संबंधांबद्दल पॉर्न स्टारने कोणताही माहिती देउ करु. तसेच याप्रकरणा संबंधात कोणतीही बोलु नये यासाठी ही रक्कम पॉर्न स्टारला पुरवल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. 

  • कोर्टात आपली बाजू मांडताना काय म्हणाले ट्रम्प? 

भारतीय वेळेनुसार, रात्री 12.45 च्या सुमारास ट्रम्प मॅनहॅटन कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर झाले. यावेळी न्यायाधीशांनी ग्रँड ज्युरींनी केलेले आरोप सीलबंद लिफाफ्यात त्यांच्याकडे सुपूर्द केले.

ट्रम्प यांना पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलला 1,22,000 डॉलर नुकसान भरपाई द्यावी लागेल, असा आदेशही न्यायालयानं दिला आहे. तसेच, ट्रम्प यांनी न्यायालयाला सांगितले की, ते निर्दोष आहेत आणि 34 प्रकरणांमध्ये त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी Not Guilty म्हणत न्यायालयात निर्दोष असल्याचं सांगितलं. ट्रम्प यांनी दोषी नसल्याची कबुली दिली. त्यांनी हेराफेरीची 34 प्रकरणं चुकीची असल्याचं सांगितलं. सुनावणीनंतर ट्रम्प रात्री एक वाजण्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) कोर्टातून बाहेर पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

SCROLL FOR NEXT