Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Donald Trump Russia Oil Tariff Exemption: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवर आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याच्या नवीन नियमांमधून सध्या तात्पुरती सूट दिली.

Manish Jadhav

Donald Trump Russia Oil Tariff Exemption: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवर आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याच्या नवीन नियमांमधून सध्या तात्पुरती सूट दिली. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारत आणि चीनसारख्या प्रमुख देशांवर ओढावलेला 100 टक्क्यांपर्यंतच्या अतिरिक्त कराचा मोठा धोका तूर्तास टळला.

अमेरिकेच्या (America) राष्ट्रीय हितांचे आणि जागतिक आर्थिक स्थैर्याचे कारण देत डोनाल्ड ट्रम्प यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. मात्र, या सवलतीचा असा अजिबात अर्थ नाही की, अमेरिकेने रशियावर लादलेले सर्व जुने निर्बंध मागे घेतले आहेत. भविष्यात गरज भासल्यास या कडक नियमांची पुन्हा अंमलबजावणी करण्याचा आणि गरज पडल्यास कठोर निर्णय घेण्याचा अधिकार ट्रम्प यांनी स्वतःकडे राखून ठेवला.

शुक्रवारी संध्याकाळी जारी केलेल्या एका विशेष कार्यकारी आदेशाद्वारे ट्रम्प यांनी 'लिंडसे ओ ग्राहम सॅंक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट, 2026' या नवीन कायद्यातील काही जाचक तरतुदींमधून ही दिलासादायक सूट जाहीर केली. विशेष म्हणजे, याच वर्षात 18 सप्टेंबर 2026 रोजी ट्रम्प यांनी स्वतः या कायद्यावर स्वाक्षरी केली होती. या कायद्यांतर्गत रशियन तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याची आणि रशियातून येणाऱ्या वस्तूंवर तब्बल 500 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारण्याची कडक तरतूद करण्यात आली होती.

रशियाच्या ऊर्जा क्षेत्राची आर्थिक कोंडी करणे आणि रशियन तेलावर लादलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांना रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. भारत आणि चीन हे रशियन कच्च्या तेलाचे सर्वात मोठे आयातदार असल्यामुळे या संभाव्य शुल्काचा थेट फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता होती.

जरी सध्या ही सवलत दिली असली, तरी अमेरिकी प्रशासन रशियन तेल आणि वायूच्या खरेदीवर अत्यंत बारीक लक्ष ठेवून असणार आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ट्रेड रिप्रेजेंटेटिव्हला विदेश, वित्त आणि ऊर्जा मंत्रालयासोबत मिळून संपूर्ण परिस्थितीवर सतत नजर ठेवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या कायद्यानुसार 18 ऑक्टोबर किंवा त्यानंतर जर रशियन कच्चे तेल व गॅसची मोठी खरेदी केली गेली, तर अमेरिका भविष्यात पुन्हा कठोर पावले उचलू शकते.

रशियाच्या ऊर्जा व्यापारावर आणि जागतिक बाजारपेठेतील इंधन किमतींवर सुरु असलेल्या राजकीय दबावामुळे अमेरिकेच्या भूमिकेत भविष्यात पुन्हा बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

SCROLL FOR NEXT