Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Donald Trump Claims Iran Behind Plane Attack: दुबईहून तेल अवीव जाणारी फ्लाईदुबईची फ्लाईट क्रमांक FZ1073 हायजॅक करण्याचा आणि इस्रायलमध्ये 9/11 सारखा भीषण दहशतवादी हल्ला घडवून घडवण्याचा कट होता.
Donald Trump Claims Iran Behind Plane Attack
Donald TrumpDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Donald Trump Claims Iran Behind Plane Attack: दुबईहून तेल अवीवला जाणारी फ्लाईदुबईची फ्लाईट क्रमांक FZ1073 हायजॅक करण्याचा आणि इस्रायलमध्ये 9/11 सारखा भीषण दहशतवादी हल्ला घडवून घडवण्याचा कट होता, असा खळबळजनक दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. 30 सप्टेंबर रोजी घडलेल्या या थरारक घटनेमागे इराणचा हात असल्याचे सांगत ट्रम्प यांनी इराणला गंभीर परिणामांची धमकी दिली.

ट्रम्प यांच्या मते, ओमानच्या को-पायलटने मुख्य पायलटवर जीवघेणा हल्ला करत विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. जर हा प्रयत्न यशस्वी झाला असता, तर इस्रायलमध्ये मोठा अनर्थ झाला असता. अमेरिकेने यापूर्वीच मध्यपूर्वेत आपल्या युद्धनौका आणि हजारो नौसैनिकांची फौज तैनात केली असून आगामी काळात यावर कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले.

Donald Trump Claims Iran Behind Plane Attack
Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

या संपूर्ण कटामागे ओमानचा (Oman) को-पायलट हम्माम अल-हम्मामी याचे कृत्य कारणीभूत असल्याचे समोर आले. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी यावर प्रतिक्रिया देताना प्रश्न उपस्थित केला की, जेव्हा आधीच काही एअरलाइन्सने अशा विचारसरणीच्या को-पायलट्सवर बंदी घातली होती, तर फ्लाईदुबईने हम्मामला उड्डाणाची परवानगी कशी दिली? ओमानच्या विमान अधिकाऱ्यांनीही त्याच्या वर्तनावर चिंता व्यक्त केली होती, तरीही फ्लाईदुबईने त्याला इस्रायलच्या संवेदनशील मार्गावर ड्युटी दिली.

Donald Trump Claims Iran Behind Plane Attack
Donald Trump Warning: 'इराणला मदत कराल तर याद राखा...' डोनाल्ड ट्रम्पनं पुन्हा जगाला धमकावलं; पुकारलं इकॉनॉमिक वॉर

या घटनेच्या दिवशी (30 सप्टेंबर) उड्डाणादरम्यान को-पायलट हम्माम-अल-हम्मामी याने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चॉपरने अचानक हल्ला केला आणि विमान पाडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात विमान तब्बल 17 हजार फूट खाली आले आणि विमानात एकच हाहाकार उडाला.

Donald Trump Claims Iran Behind Plane Attack
Donald Trump: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा!' डोनाल्ड ट्रम्प यांना इराणी वृत्तपत्राचा इशारा; आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ

दरम्यान, एटीसीला इमर्जन्सी अलर्ट मिळाला आणि इस्रायल-सऊदी अरेबियाची वायुसेना सतर्क झाली. परंतु, जखमी होऊनही कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि कॉकपिटचे दार उघडून प्रवाशांनी दाखवलेल्या धाडसामुळे हल्लेखोराला जागेवरच रोखण्यात यश आले. प्रवाशांच्या आणि पायलटच्या या अंगावर काटा आणणाऱ्या शौर्यामुळे विमानात असलेल्या 174 जणांचा जीव थोडक्यात वाचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com