Diya Mutiara Sukmavati: जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशिया (Indonesia) देशाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो (Indonesia former President Sukarno) यांची मुलगी दिया मुतियारा सुकमावती (Diya Mutiara Sukmavati) हिने इस्लाम धर्म (Islam) सोडून हिंदू धर्म (Hindu) स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती सुकर्णोची मुलीला इंडोनेशिया मध्ये 'सुकमावती सुकर्णोपत्री' म्हणूनही ओळखले जाते. धर्मांतर समारंभाचे प्रभारी आर्य वेदकर्ण म्हणाले की, 26 ऑक्टोबर रोजी बाली अगुंग सिंगराजा येथे 'शुद्धी वधनी' (Shuddhi Vadhani) नावाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ते हिंदू धर्म स्वीकारतील. धर्मांतर समारंभाची तारीख सुकमावती यांचा ७० वा वाढदिवस (Sukmavati's 70th Birthday) देखील आहे.
आजीच्या प्रेरणेने हा निर्णय घेतला
सुकमावतीची आजी, दिवंगत इडा आयु न्योमन राय श्रीम्बेन (1881-1958) यांच्या प्रभावाखाली हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सुकमावतीच्या वकिलांनी सांगितले की याचे कारण तिच्या आजीचा धर्म आहे. सुकमावतींनी हिंदू धर्मशास्त्राचा चांगला अभ्यास केला आहे. बालीच्या तिच्या पूर्वीच्या भेटी दरम्यान, सुकमावती अनेकदा हिंदू धार्मिक समारंभांना उपस्थित राहिली आणि हिंदू धार्मिक व्यक्तींशी संवाद साधला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.