'डेम सँड्रा मॅसन' होणार बार्बाडोसच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षा

बार्बाडोस संसदेने अधिवेशन बोलावून दोन तृतियांश मतदानाने 'डेम सँड्रा मॅसन' यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून केली निवड
बार्बाडोसच्या होणाऱ्या पहिल्या राष्ट्राध्यक्षा डेम सँड्रा मॅसन
बार्बाडोसच्या होणाऱ्या पहिल्या राष्ट्राध्यक्षा डेम सँड्रा मॅसनDainik Gomantak
Published on
Updated on

President of Barbados: 19 आणि 20 व्या शतकात जगातील अनेक देशांत ब्रिटिशांनी आपली सत्ता स्थापन (British government) केली होती, मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर (World War II) त्यातले अनेक देश पारतंत्र्यातून मुक्त झाले होते. मात्र जगातील आजही अनेक देश असे आहेत तिथे ब्रिटनच्या महाराणी 'एलिझाबेथ' (Queen Elizabeth) या प्रमुख आहेत. तसे पाहायला गेलो तर 'बार्बाडोस' (Barbados) देश सुद्धा ब्रिटिशांच्या सत्तेतून 54 वर्षांपूर्वीच स्वतंत्र झाला होता, मात्र तिथे महाराणी 'एलिझाबेथ' या प्रमुख होत्या. आता मात्र बार्बाडोस प्रजासत्ताक झाला आहे. व बार्बाडोसच्या संसदेने नव्या आणि पहिल्या राष्ट्राध्यक्षाची निवडसुद्धा केली आहे. बार्बाडोस संसदेने दोन्ही सदनासाठी संयुक्त अधिवेशन बोलावून दोन तृतियांश मतदानाने 'डेम सँड्रा मॅसन' यांना राष्ट्राध्यक्ष (Dame Sandra Mason) म्हणून नियुक्त केलं आहे.

बार्बाडोसच्या होणाऱ्या पहिल्या राष्ट्राध्यक्षा डेम सँड्रा मॅसन
चीनच्या केमिकल प्लांटमध्ये मोठा स्फोट, 4 ठार तर 3 जण जखमी

बार्बाडोसच्या प्रथम राष्ट्राध्यक्षा होणाऱ्या डेम सँड्रा मॅसन या ७२ वर्षांच्या असून ३० नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या 55व्या वर्धापनदिनी त्या बार्बाडोसच्या राष्ट्राध्यक्षा म्हणून सूत्रे सांभाळतील. 2018 पासून देशाच्या गव्हर्नर जनरल म्हणून त्या काम पाहत होत्या. बार्बाडोस सरकारने 2020 मध्येच प्रजासत्ताक होण्याचा निर्णय घेतला होता. बार्बाडोस सरकारने म्हणण्यानुसार, देशाचे पारतंत्र्य आता इतिहास जमा करण्याची वेळ आली आहे. या बदलाची शिफारस 1998 मध्येच करण्यात आली. मात्र संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनानंतर याची घोषणा केली गेली.

बार्बाडोसच्या होणाऱ्या पहिल्या राष्ट्राध्यक्षा डेम सँड्रा मॅसन
इस्लामिक स्टेटने केली तालिबानची 'बत्ती गुल', दिला गर्भित इशारा

एका बेटावर बार्बाडोस देश वसलेला असून सुमारे तीन लाखांच्या आसपास या देशाची लोकसंख्या आहे. बार्बाडोस हा कॅरेबियन बेटांमधील जास्त लोकसंख्या असलेला असा संपन्न असा हा देश आहे. केवळ साखर निर्यात करणाऱ्या या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. ब्रिटिशांनी राज्य केलेल्या कॅरेबियन बेटांमधील प्रजासत्ताक होणारा गयाना हा पहिला देश असून तो 1970 स्वतंत्र होऊन 4 वर्षांनी प्रजासत्ताक झाला होता. त्यानंतर त्रिनिनाद आणि टोबॅगोने 1976 मध्ये डोमिनिका 1978 मध्ये प्रजासत्ताक राष्ट्र झाले होते.

बार्बाडोसच्या होणाऱ्या पहिल्या राष्ट्राध्यक्षा डेम सँड्रा मॅसन
तानाशाहच्या उत्तर कोरियात लोकं भुकेने व्याकुळ: UN च्या संशोधकाचा अहवाल

बार्बाडोसचा विचार करता 1625 मध्ये इंग्रजांनी या देशावर ताबा मिळवला होता. इथल्या लोकांनी इंग्रजी संस्कृती आणि परंपरा आत्मसात केल्यामुळे बार्बाडोसला गंमतीने 'लिटिल इंग्लंड' असंही म्हटलं जायचे.

बार्बाडोसव्यतीरिक्त जमैकाने सुद्धा प्रजासत्ताक होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. इतर कॅरेबियन बेटांपैकी अँटिग्वा, बेलीजे, ग्रेनेडा, सेंट विन्सेट अँड द ग्रेनडाइन्स, बारबुडा, बाहमा बेट, सेंट लुसिया हे असे देश आहेत जिथे ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ या प्रमुख आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीडंल या मोठ्या देशांचासुद्धा यामध्ये समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com