Diwali Holidays In New York Dainik Gomantak
ग्लोबल

Diwali In New York: अमेरिकेतही फुटणार फटाके! न्यूयॉर्कमध्ये शाळांना मिळणार दिवाळीची सुट्टी

New York शहरातील दक्षिण आशियाई आणि इंडो-कॅरिबियन समुदायांची संख्या मोठी असल्याने, शाळेच्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये दिवाळीचा सणाचाही समावेश केला जाईल.

Ashutosh Masgaunde

Diwali Holidays In New York City: अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. न्यूयॉर्कच्या शाळांना आता दिवाळीची सुट्टी असणार आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

ते म्हणाले की, मला सांगायला अभिमान वाटतो की, न्यूयॉर्क शहरातील शाळांना दिवाळीनिमित्त सुट्टी दिली जाणार आहे. इथले स्थानिक आमदार जेनिफर राजकुमार आणि भारतीय समुदाय या सुट्टीसाठी खूप लढला.

जेनिफर या न्यूयॉर्क राज्य प्रतिनिधीगृहात निवडून आलेल्या पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला आहेत. त्या म्हणाल्या की, न्यूयॉर्क सिटी पब्लिक स्कूलने दिवाळीच्या सुट्टीशी संबंधित विधेयक मंजूर केले आहे.

दिवाळी साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये साजरी केली जाते. हा सण न्यू यॉर्कमधील लोखो नागरिकांकडून साजरा केला जातो. त्यामुळे न्यू यॉर्कच्या खासदारांनी नुकतेच शालेय सुट्ट्यांमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांचा समावेश करणारा कायदा मंजूर केल्यानंतर ही घोषणा झाली.

यावर्षी दिवाळी रविवारी म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी येत आहे, याचा अर्थ 2023-2024 च्या शाळेच्या कॅलेंडरवर या बदलाचा परिणाम होणार नाही.

अधिकृत आकडेवारीनुसार न्यूयॉर्क शहरातील 200,000 रहिवासी दिवाळी साजरी करतात. हे असे शहर आहे जे सतत बदलत असते, जगभरातील समुदायांचे सतत स्वागत करत असते.

सेन्सस ब्युरोच्या आकडेवारीनुसार न्यूयॉर्क शहरातील भारतीय रहिवाशांची लोकसंख्या गेल्या तीन दशकांत दुप्पट झाली आहे, 1990 मधील 94,000 वरून 2021 अमेरिकन समुदाय सर्वेक्षणात जवळपास 213,000 झाली आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकन संसदेत दिवाळीच्या सुट्टीबाबत विधेयक मांडण्यात आले होते. अमेरिकन खासदार ग्रेस मेंग यांनी हे विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडले. यामध्ये संपूर्ण अमेरिकेत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Flood Crisis: आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT