Air India Flight: फ्लाइटमध्येच प्रवाशाने...; गलिच्छ कृत्य करणाऱ्या एकास दिल्ली विमानतळावर अटक

Air India: याप्रकारामुळे सहप्रवाशी प्रचंड संतापले, त्यानंतर केबिन क्रूने आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, असे सांगितल्यानंतर सर्वजण शांत झाले.
Air India
Air IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Man Urinates On Air India Flight: फ्लाइटमध्ये आणखी एक घाणेरडा प्रकार समोर आला आहे, आता एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने लघूशंका केली. ही घटना मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये घडली, त्यानंतर आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली.

फ्लाइट कॅप्टनच्या तक्रारीनंतर इंदिरा गांधी विमानतळावरील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपीला तेथून अटक केली. राम सिंह असे आरोपीचे नाव आहे.

इशारा देऊनही...

मिळालेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी एअर इंडियाच्या एआयसी ८६६ फ्लाइटमध्ये ही घटना घडली. पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, राम सिंह नावाच्या प्रवाशाने विमानाच्या फ्लोअरवर शौच आणि लघूशंका केली आणि नंतर तेथे थुंकला.

यावेळी चालक दलातील सदस्यांनी प्रवाशाला इशारा दिला, मात्र तरीही तो थांबला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Air India
Pink Whats App: भल्या भल्यांना चुना लावणाऱ्या, पिंक व्हाट्सअ‍ॅप बद्दलच्या पाच प्रश्नांची उत्तरे

कॅप्टनकडून तक्रार दाखल

एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, इशारा दिल्यानंतर केबिन क्रूने फ्लाइटच्या कॅप्टनला माहिती दिली. यानंतर कॅप्टनने कंपनीला मेसेज पाठवला, ज्यामध्ये एअरपोर्ट सिक्युरिटीला आरोपी व्यक्तीला विमानतळावर पकडण्यास सांगण्यात आले.

विमान कंपनीने सांगितले की, यावेळी फ्लाइटमधील प्रवाशांनी याचा निषेध केला. ते याप्रकारामुळे प्रचंड संतापले, त्यानंतर केबिन क्रूने आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, असे सांगितल्यानंतर सर्वजण शांत झाले.

Air India
Goldy Brar: "होय, मीच मुसेवालाला मारले, सलमानलाही मारणारच..."; पहा गँगस्टर गोल्डी ब्रारची हिम्मत

आरोपीला जामीन

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आफ्रिकेत शेफ म्हणून काम करतो. जो एअर इंडियाच्या एआयसी ८६६ या विमानातून मुंबईला जात होता.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'दिल्ली पोलिसांनी फ्लाइट कॅप्टनच्या तक्रारीवरून कलम 294/510 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली, त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला जामीन मंजूर करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com