Delta Flight 104 Engine Sparks Video Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

Delta Flight 104 Engine Sparks Video: ब्राझीलमधील साओ पाउलो विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही वेळातच डेल्टा एअरलाईन्सच्या एका विमानात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Delta Airlines Flight Engine Fire 2026: ब्राझीलमधील साओ पाउलो विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही वेळातच डेल्टा एअरलाईन्सच्या एका विमानात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली. अटलांटाकडे जाणाऱ्या 'एअरबस A330-300' या विमानातील 272 प्रवासी आणि 14 क्रू मेंबर्सचे प्राण एका तांत्रिक बिघाडामुळे टांगणीला लागले होते. रविवार, 29 मार्च 2026 रोजी घडलेल्या या घटनेचे अंगावर शहारे आणणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रात्रीच्या अंधारात विमानाच्या डाव्या पंखातून आगीच्या ज्वाळा आणि ठिणग्या बाहेर पडताना दिसत आहेत.

ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानाने टेक-ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ही दुर्घटना घडली. विमानाने उंची गाठताच त्याच्या एका इंजिनने पेट घेतला आणि आगीचा गोळा आकाशात दिसू लागला. इतकेच नाही तर इंजिनचे काही तुकडे जमिनीत पडतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. विमानातील प्रवासी या भीषण दृश्यामुळे पूर्णपणे हादरुन गेले होते. विमानामध्ये असलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्या आणि भीतीचे वातावरण एका व्हिडिओतून समोर आले. मात्र, वैमानिकांनी अत्यंत संयम राखून परिस्थिती हाताळली.

या संकटसमयी एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) तातडीने वैमानिकांना सतर्क केले. "डेल्टा 104, तुमच्या पंखाला आग लागली," असा संदेश मिळताच वैमानिकांनी क्षणाचाही विलंब न लावता "हो, आम्हाला परत फिरावे लागेल," असे उत्तर देत विमानतळाकडे धाव घेतली. फ्लाईट ट्रॅकिंग डेटानुसार, हे विमान हवेत केवळ 9 मिनिटे होते. तांत्रिक बिघाडामुळे इंजिनमध्ये ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

सुदैवाने, विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात वैमानिकांना यश आले आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमान जमिनीवर उतरताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी धाव घेत बचावकार्य सुरु केले. डेल्टा एअरलाईन्सने या घटनेबद्दल प्रवाशांची माफी मागितली असून "प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे," असे स्पष्ट केले. या गंभीर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT