Cyclone  Dainik Gomantak
ग्लोबल

Cyclone Freddy: मलावीमध्ये फ्रेडी चक्रीवादळाचा तांडव, 300 हून अधिक जणांचा मृत्यू

Cyclone Freddy: आफ्रिकेत निसर्गाने कहर केला आहे. दोन कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या मलावीला हवामानाचा मोठा फटका बसला आहे.

Manish Jadhav

Cyclone Freddy: आफ्रिकेत निसर्गाने कहर केला आहे. दोन कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या मलावीला हवामानाचा मोठा फटका बसला आहे.

फ्रेडी (Freddy) वादळाने या देशात कहर केला आहे. यामुळे येथे 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वादळाचा सर्वाधिक प्रभाव ब्लांटायर शहराजवळ नोंदवला गेला आहे.

जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार, हे वादळ दक्षिण गोलार्धात आतापर्यंत आलेल्या सर्व वादळांपेक्षा अधिक घातक असू शकते.

मोझांबिकलाही (Mozambique) या वादळाचा फटका सहन करावा लागला आहे. फ्रेडीचे वादळ इतके धोकादायक होते की, मोझांबिकमधील अनेक इमारती त्याच्या कचाट्यात येऊन कोसळल्या. यासोबतच अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले आहे.

कॉलराचा उद्रेक

मलावीतील क्वेलमेन बंदराजवळ पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी, मलावी इतिहासातील सर्वात घातक कॉलराच्या उद्रेकाशी देखील लढत आहे.

अशा परिस्थितीत, संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) एजन्सींनी जारी केलेल्या इशाऱ्यांनुसार, मलावीमध्ये अतिवृष्टीमुळे कॉलराची स्थिती आणखी बिघडू शकते.

मलावीचे अध्यक्ष लाझारस चकवेरा यांनी घोषणा केली की, फ्रेडी चक्रीवादळामुळे मृतांची संख्या 326 वर पोहोचली आहे.

गुरुवारी उशिरा राष्ट्राला संबोधित करताना, त्यांनी सांगितले की, जखमी आणि बेपत्ता झालेल्यांची संख्या अनुक्रमे 201 आणि 796 वर पोहोचली आहे, अशी माहिती शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली.

विस्थापित लोकांची संख्या दुपटीने वाढून 183,159 झाली आहे, असे ते म्हणाले. विस्थापित कुटुंबांची संख्या आता 40,702 वर पोहोचली आहे.

वादळात मृतांचा आकडा वाढला

चकवेरा यांच्या मते, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देशाने चक्रीवादळ प्रवण क्षेत्रात 317 छावण्या उभारल्या आहेत.

मलावी नेत्याने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून अधिक मानवतावादी समर्थनाच्या गरजेचा पुनरुच्चार केला. दरम्यान, चक्रीवादळामुळे बाधित रहिवाशांना मदत करण्यासाठी स्थानिक व्यवसायिकांनी $1.5 दशलक्ष उभे करण्याचे वचन दिले आहे.

जागतिक हवामान संघटनेच्या मते, फ्रेडी हे सर्वात तीव्र चक्रीवादळ असून त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहू शकतो.

मोझांबिक आणि मलावीमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. प्रभावित भागातील काही भागात वीजपुरवठा आणि फोनचे सिग्नल खंडित झाल्याने मृतांची संख्या वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

SCROLL FOR NEXT