Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: दिल्लीपेक्षा लहान असणाऱ्या या देशाने रशियाला दिली टक्कर

इथे लिथुआनियाबद्दल बोलले जात आहे, ज्याने रशियाच्या कॅलिनिनग्राडला रेल्वेने जाणाऱ्या मालावर बंदी घातली आहे.

दैनिक गोमन्तक

Russia threats Lithuania on Kaliningrad: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही. दरम्यान, लोकसंख्या आणि क्षेत्रफळात दिल्लीपेक्षा लहान असलेल्या देशाने रशियासमोर उभे ठाकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. इथे लिथुआनियाबद्दल बोलले जात आहे, ज्याने रशियाच्या कॅलिनिनग्राडला रेल्वेने जाणाऱ्या मालावर बंदी घातली आहे.

रशिया का भडकला?

वास्तविक, लिथुआनिया एकेकाळी तत्कालीन सोव्हिएत युनियनचा (यूएसएसआर) भाग होता. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर लिथुआनिया वेगळा देश बनला.

असे उत्तर देईल की...: रशिया

रॉयटर्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, लिथुआनियाने रशियाची (Russia) पुरवठा साखळी रोखल्यास योग्य त्या परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी रशियाने दिली आहे. दुसरीकडे, आपल्यावर हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे लिथुआनियाने म्हटले आहे. लिथुआनियाने नुकतीच रशियाची पुरवठा साखळी रोखली आहे.

लिथुआनियाने रशियाची रसद थांबवली

मॉस्कोच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात प्रश्न विचारला असता, लिथुआनियाने सांगितले की, 'युरोपियन युनियन (European Union) च्या निर्बंधांमुळे आपण हे केले आहे.' म्हणजेच, लिथुआनियाने युरोपियन युनियनच्या निर्बंधांच्या नियमांचा हवाला देत कॅलिनिनग्राडमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या मालावर बंदी घातली आहे.

दुसरीकडे, रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पेत्रुशेव्ह म्हणाले की, 'योग्य वेळ आल्यास लिथुआनियाला उत्तर दिले जाईल.' त्यावर लिथुआनियाचे राष्ट्राध्यक्ष गितानास नौसेदा म्हणाले की, 'आपण रशियाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहोत.' तथापि, ते असेही म्हणाले की, 'रशिया आपल्या विरोधात कोणतीही लष्करी कारवाई करेल असे मला वाटत नाही, कारण आम्ही नाटोचे सदस्य आहोत.'

लिथुआनियाची शक्ती

लिथुआनिया क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने दिल्लीपेक्षा (Delhi) लहान आहे. या देशाची लोकसंख्या सुमारे तीस लाख आहे, ज्यात फक्त 16 हजार सैनिक आहेत. परंतु त्यांच्या देशवासीयांचे इरादे युक्रेनपेक्षा कमकुवत नाहीत. त्याचवेळी रशियाविरुद्ध मोठे पाऊल उचलून त्यांनी हे सिद्ध केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT