गेले शंभरहून अधिक दिवस रशिया - युक्रेन युद्धाने जगाची चिंता वाढवली आहे. या युद्धामूळे जगाच्या समस्यांमध्ये दिवसें- दिवस वाढच होती आहे. इंधन , नैसर्गिक वायू यांसारख्या वस्तुच्या पुरवठ्यात निर्माण झालेला तुटवडा. आणि यामूळे जगभरात वाढत असलेले इंधनाचे दर अशा प्रकारे अनेक राष्ट्रांना अर्थिक तुटवड्याचा सामना करावा लागतो आहे. असे असले तरी रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याचे संकेत अद्याप समोर दिसत नाहीत. उलट सेवेरोडोनेत्स्क शहर रशियाच्या ताब्यात जाणार अशी स्थिती आता युक्रेनमध्ये निर्माण झाली आहे. ( Russian city of Severodonetsk is under Russian control )
मिळालेल्या माहितीनुसार युक्रेनचे सेवेरोडोनेत्स्क हे दाट लोकवस्तीचे शहर आहे. यामूळेच मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू झाला असावा असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. युक्रेनियन सैन्याने आपल्या देशाच्या पूर्वेकडील भागावरील नियंत्रण जवळजवळ गमावले आहे.
युक्रेनियन सैन्य एका मोठ्या पुलावरून सेवेरोडोनेत्स्क शहरापर्यंत पोहोचत राहिले आहे. युक्रेनियन सैन्य येथे मोठ्या संख्येने उपस्थित असले तरी त्यांच्याकडे शस्त्रे आणि दारूगोळा कमी आहे. मात्र, युक्रेनच्या दक्षिणेकडील भागात आणि विशेषत: खेरसन परिसरात रशियन सैन्याचे मोठ्या प्रमाणात आहे.
महिन्याभरापूर्वी रशियाने ताब्यात घेतलेल्या खेरसन शहरावर आता पुन्हा युक्रेनच्या लष्कराची पकड मजबूत होत आहे. एका प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याला दुजोरा दिला आहे. मात्र, युक्रेनचे सैन्य अजूनही खेरसनपासून 18 किलोमीटर दूर आहे. अशी स्थिती सद्या आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.