Copa Airlines Dainik Gomantak
ग्लोबल

Copa Airlines: बॉम्बची माहिती हाती आले डायपर; अमेरिकेतील विमानात नक्की काय घडलं?

अमेरिकेतील पनामा सिटीमध्ये ही घटना घडली.

Pramod Yadav

Copa Airlines: फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याच्या अनेक बातम्या वेळोवेळी समोर येत असतात, अनेकदा ही माहिती खोटी निघते. केवळ भारतातच अशा घटना घडतात असे नाही तर, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशांमध्येही अशा घटना समोर येत असतात.

अमेरिकेतून आलेल्या एका घटनेत विमानात बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आणि विमान विमानतळावर उतरवण्यात आले.

144 प्रवासी असलेल्या या विमानाची तपासणी करण्यात आली असता त्यात बॉम्ब नव्हे तर डायपर असल्याचे आढळून आले.

अमेरिकेतील पनामा सिटीमध्ये ही घटना घडली. कोपा एअरलाइन्सचे विमान पनामा सिटी ते टँपा, फ्लोरिडाकडे उड्डाण करणारे हवाई परिवहन नुकतेच आकाशात पोहोचले. अधिकार्‍यांना विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. विमान घाईघाईने टोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत आले.

सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली. तपासाअंती धक्कादायक माहिती समोर आली. विमानातील ज्या वस्तूला बॉम्ब मानले जात होते ती वस्तु प्रत्यक्षात एका प्रौढ व्यक्तीचे डायपर होते.

पनामाच्या सिव्हिल एरोनॉटिक्स अथॉरिटीने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. बोईंग 737-800 स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता विमानतळावर परत आले. त्याला विमानतळावरील एका वेगळ्या धावपट्टीवर नेण्यात आले. सर्व 144 प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले.

स्फोटकविरोधी पथकाने विमानाची झडती घेतली. विमानातील एका शौचालयातील संशयास्पद वस्तू प्रौढ डायपर असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या विशेष श्वान पथकाने आणि विशेष दलांनी संशयास्पद वस्तूची तपासणी केली असता ते प्रौढ डायपर असल्याचे आढळून आले, असे विमानतळ सुरक्षा प्रमुख जोस कॅस्ट्रो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT