Nupur Sharma Dainik Gomantak
ग्लोबल

नुपुर शर्मा यांच्या हत्येचा कट; Tehreek-e-Labbaikचा हशतवादी पोलिसांच्या ताब्यात

दैनिक गोमन्तक

भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या हत्येचा कट पाकिस्तानी संघटना तहरीक-ए-लब्बैकने (Tehreek-e-Labbaik Pakistan) रचला असल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. राजस्थान पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. सीमा ओलांडून पाकिस्तानातून भारतात आलेल्या रिजवान या पाकिस्तानी नागरिकावरही या संघटनेचा प्रभाव असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे. सध्या अनेक एजन्सी देखील त्याची चौकशी करत आहेत. (Conspiracy to kill Nupur Sharma Tehreek e Labbaik terrorist in police custody)

एएनआय न्यूज एजन्सीनुसार, अतिरिक्त डीजीपी (इंटेलिजन्स) एस सेनगाथिर यांनी सांगितले की, 'पाकिस्तानी संघटना तहरीक-ए-लब्बैकने (Tehreek-e-Labbaik Pakistan) नुपूर शर्मा यांना मारण्याची योजना आखली आहे. पाकिस्तानी दहशतवादी रिझवानवरही तेहरीक-ए-लब्बैकचा प्रभाव होता तर त्याच्या योजनेनुसार त्याला सीमा ओलांडून भारतात प्रवेश करायचा होता.

"आयबी, सीआयडी, बीएसएफ, भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांसह अनेक एजन्सी आता रिझवानची चौकशी करत आहेत," असे अधिकाऱ्याने यावेळी सांगितले. ही तीच संघटना आहे, जिने गेल्या वर्षी पाकिस्तानात इम्रान खान सरकारला घेरण्याचे काम केले होते आणि पाकिस्तानात अनेकांचे बळी देखील घेतले होते. नुपूर शर्मा यांच्या हत्येचा कट रचून भारतात आलेल्या या व्यक्तीला राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये पकडण्यात आले आहे.

बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या व्यक्तीला 16 जुलै रोजी रात्री 11 वाजता हिंदूमलकोट सीमा चौकीजवळ पकडण्यात आले आहे. गस्ती पथकाला तो संशयास्पद अवस्थेमध्ये आढळून आला, आणि त्यानंतर त्याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 11 इंची चाकू, धार्मिक पुस्तके, कपडे, अन्न आणि वाळू जप्त करण्यात आली आहे तर रिजवान अश्रफ असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानच्या उत्तर पंजाबमधील मंडी बहुद्दीन शहरातील रहिवासी आहे.

त्यांनी सांगितले की, सुरुवातीच्या तपासात संशयिताने सांगितले की, पैगंबरावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो नुपूर शर्माला मारण्यासाठी भारतात आला होता. आपली योजना पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी अजमेर दर्ग्याला भेट देण्याची योजना देखील आखली होती. “आम्ही त्याला तपासासाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यामध्ये दिले आहे. त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, तेथून त्याला 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत आम्ही संबंधित गुप्तचर यंत्रणांना कळवले आहे असेही यावेळी सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT