Congo Army Recruitment Rally Accident: सैन्यात नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने भरती मेळाव्यात सहभागी झालेल्या तरुणांना हा दिवस आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल याची कल्पना नव्हती.
स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 37 जणांचा मृत्यू झाला, तर जखमींची खरी संख्या अद्याप समजलेली नाही. काँगो प्रजासत्ताकची राजधानी ब्राझाव्हिल येथे हा अपघात (Accident) झाला. पंतप्रधानांनी अपघाताला दुजोरा दिला आणि मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली.
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, आर्नानो स्टेडियममध्ये 14 नोव्हेंबर रोजी सैन्य भरती मोहीम सुरु करण्यात आली होती. भरती मोहिमेदरम्यान मोठ्या संख्येने तरुण स्टेडियमवर पोहोचल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. या अपघातात 37 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अपघाताचे खरे कारण समोर आलेले नाही. या घटनेमागची कारणे तपासली जात आहेत.
दरम्यान, मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. काँगो प्रजासत्ताकचे पंतप्रधान एनाटोल कॉलिनेट मॅकोस्सो यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेल्या फोटोंमध्ये तरुण बास्केटबॉल कोर्टच्या फरशीवर जखमी अवस्थेत पडलेले दिसत आहेत. भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात आली आहे.
भरती मोहिमेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या तरुणांनी ही चेंगराचेंगरी केल्याचे बोलले जात आहे. जखमींना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या अधिकारात एक क्रायसिस युनिट तयार करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांगो सैन्याने 18 ते 25 वर्षे वयोगटातील 1,500 लोकांची भरती करण्याची घोषणा केली होती. भरतीसंदर्भात काल रात्रीपासूनच ओरनानो स्टेडियमवर तरुणांची गर्दी होऊ लागली होती. काही लोक गेटच्या दिशेने ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, चेंगराचेंगरी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी दाखल केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.