Colombia Cartagena Supermarket Hostage Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

कॅश व्हॅन लुटण्याचा डाव फसला अन् दरोडेखोर शिरले थेट सुपरमार्केटमध्ये, 25 जणांना ओलिस ठेवून केली 20 लाख डॉलरची मागणी; कोलंबियात थरार! VIDEO

Colombia Cartagena Supermarket Hostage Crisis: कोलंबियातील कार्टाजेना येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या हल्लेखोरांनी एका सुपरमार्केटमध्ये सुमारे 25 नागरिकांना ओलीस ठेवले.

Manish Jadhav

Colombia Cartagena Supermarket Hostage Crisis: कोलंबियातील कार्टाजेना येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या हल्लेखोरांनी एका सुपरमार्केटमध्ये सुमारे 25 नागरिकांना ओलीस ठेवले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्लेखोरांचा मुख्य उद्देश एका कॅश व्हॅनवर दरोडा टाकण्याचा होता. मात्र, स्थानिक पोलिसांना त्यांच्या हालचालींची कुणकुण लागताच पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. स्वतःला पोलिसांनी (Police) वेढल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या हल्लेखोरांनी जवळच्याच सुपरमार्केटमध्ये धाव घेतली आणि आतील ग्राहक व कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर ताब्यात घेतले.

या गंभीर संकटाबाबत माहिती देताना राष्ट्राध्यक्ष एस्प्रिएला यांनी स्पष्ट केले की, सुरुवातीला हल्लेखोरांनी सुपरमार्केटमधील सुमारे 30 जणांना ओलीस ठेवले. परंतु सुरक्षा दलांचा वाढता दबाव आणि प्राथमिक चर्चेनंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून पाच वृद्ध महिलांची सुखरुप सुटका करण्यात आली. तरीही अद्याप 25 निरपराध नागरिक हल्लेखोरांच्या ताब्यात असून, त्यांना कोणतीही इजा न होता बाहेर काढणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोलंबियाचे पोलीस आणि लष्कराने संयुक्त कारवाई सुरु केली असून संपूर्ण परिसराला कडेकोट वेढा घातला. उंच इमारतींवर विशेष स्नायपर्स तैनात केले असून आजूबाजूच्या रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.

दरम्यान, सुपरमार्केटमध्ये दडून बसलेल्या हल्लेखोरांनी प्रशासनासमोर आपल्या अटी ठेवल्याचे समजते. ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात त्यांनी सुमारे 20 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सोळा कोटी रुपयांहून अधिक खंडणीची मागणी केली. यासोबतच सुरक्षित पलायनासाठी दोन चिलखती वाहने आणि बॅरांक्विला शहरापर्यंत जाण्यासाठी सुरक्षित मार्ग देण्याची अटही त्यांनी घातली असून, या प्रकरणी पुढील घडामोडी वेगाने सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Employment Schemes:16 सरकारी खाती, 60 योजना अन् 24 प्रशिक्षण संस्था; महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी

Drug Case: कारमध्ये लपवला होता कोट्यवधींचा गांजा; पर्वरीत पोलिसांचा छापा, गुजरातचा युवक अटकेत

Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

Ambulance Service: रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाहीत? 108 सेवेतील त्रुटींवर आरजीपीचे आरोग्य खात्याला निवेदन

IND vs NZ 2nd Test: क्राइस्टचर्चची वाट सोपी नाही! जुना पराभव अन् हॅगली ओव्हलचा रेकॉर्ड वाढवतोय टीम इंडियाची धाकधूक; गिल सेनेपुढे खडतर आव्हान

SCROLL FOR NEXT