CITI Bank fired the employee who made the false reimbursement claims. Dainik Gomantak
ग्लोबल

एका सॅंडविचसाठी गमावली लाखोंची नोकरी, खोटा क्लेम करणाऱ्या कर्मचाऱ्याला CITI Bank ने हाकलले

CITI Bank: प्रत्युत्तरात, सिटी बँकचे व्यवस्थापक म्हणाले की, "पावतीमध्ये दोन सँडविच, दोन कॉफी आणि दुसरे पेय आहे असे दिसते ... खरंच हे सर्व तुम्ही खाल्ले आहे का?"

Ashutosh Masgaunde

CITI Bank fired the employee who made the false reimbursement claims:

बँकिंग क्षेत्रातील दिग्गज CITI Bank ने युनायटेड किंगडममध्ये एका कर्मचाऱ्याला बिझनेस ट्रीपदरम्यान सँडविच आणि कॉफीसाठी खर्चाचा खोटा क्लेम केल्याबद्दल आणि नंतर त्याबद्दल खोटे पुरावे सादर केल्याबद्दल कामावरून काढून टाकले होते.

बीबीसीच्या म्हणण्यानुसार, माजी आर्थिक विश्लेषक स्झाबोल्क्स फेकेटे यांनी मागील वर्षी नोकरीवरुन काढल्यानंतर बँकेवर अन्यायकारक बरखास्तीसाठी दावा दाखल केला होता.

कर्मचाऱ्याने सुरुवातीला सांगितले की, त्याने दोन सँडविच, दोन पास्ता डिशेस आणि दोन कॉफी अ‍ॅमस्टरडॅमच्या बिझनेस ट्रिप दरम्यान स्वतःच खाल्ल्या होत्या, पण, नंतर त्याने कबूल केले की, यामधील थोडे अन्न त्याच्या मित्रानाेही खाल्ले होते.

बीबीसीच्या म्हणण्यानुसार, सिटीबँकमध्ये सात वर्षे काम करणारे फेकेटे 2022 मध्ये 3 ते 5 जुलै दरम्यान कामासाठी अ‍ॅमस्टरडॅमला गेले होते.

लंडनला परतल्यावर त्यांनी खाण्यापिण्यासाठी खर्चाचा क्लेम दाखल केला होता. त्यावेळी कंपनीकडून कर्मचाऱ्याला पावत्या मागितल्या. तसेच हे अन्नपदार्थ कर्मचाऱ्याने एकट्यानेच खाल्ले आहेत का याची विचारणा कंपनीने केली होती. त्यावेळी कर्मचारी खोट बोलला होता.

सिटीबँकच्या कर्मचार्‍याने त्याच्या व्यवस्थापकासह झालेल्या ईमेल संभाषणामध्ये सांगितले की, त्याने "पावती तपासली होती आणि त्याला यामध्ये काहीही चुकीचे दिसले नाही...मी स्वतः बिझनेस ट्रीपवर होतो आणि... मी दोनच कॉफी घेतल्या होत्या."

प्रत्युत्तरात, सिटी बँकचे व्यवस्थापक म्हणाले की, "पावतीमध्ये दोन सँडविच, दोन कॉफी आणि दुसरे पेय आहे असे दिसते ... खरंच हे सर्व तुम्ही खाल्ले आहे का का?"

यावर फेकेट यांनी स्पष्टीकरण दिले, "त्या दिवशी मी नाश्ता न करता सकाळी फक्त 1 कॉफी घेतली. दुपारच्या जेवणासाठी मी रेस्टॉरंटमध्ये ड्रिंकसह 1 सँडविच आणि 1 कॉफी घेतली आणि ऑफिसमध्ये परत येताना दुसरी कॉफी घेतली आणि दुपारचे दुसरे सँडविच घेतले... जे माझे रात्रीचे जेवण देखील होते."

"माझा सर्व खर्च 100 युरो दैनंदिन भत्त्याच्या आत आहेत. कृपया तुमची चिंता काय आहे ते सांगू शकाल का? कारण मला वाटत नाही की मी माझ्या खाण्याच्या सवयींना या मर्यादेपर्यंत न्याय देऊ नये," असे कर्मचारी पुढे त्याच्या व्यवस्थापकाला म्हणाला.

दुसरीकडे, बँकेने सांगितले की, त्यांची चिंता रकमेबद्दल नाही, परंतु जर कर्मचारी खोट्या क्लेमद्वारे कंपनीच्या खर्च व्यवस्थापन धोरणाचा भंग केला असेल, तर हे चुकीचे आहे.

नंतर कर्मचाऱ्याने कबूल केले की, त्याने कंपनीच्या खर्चातून आपल्या मित्राचाही खाण्याचा खर्च केला होता.

तथापि, सिटी बँकेने शेवटी फेकेटे यांना नोकरीवरुन काढले. एम्प्लॉयमेंट जज इलिंग यांनी निष्कर्ष काढला की, कंपनीचा निर्णय योग्य होता कारण मिस्टर फेकेटे कंपनीच्या खर्चाबद्दल प्रामाणिक नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT