Karachi Pakistan Maxar tech
ग्लोबल

पाकिस्तानच्या कराची बंदरावर चिनी युद्धनौका आणि पाणबुड्या तैनात, सॅटेलाइट इमेज समोर

पाकिस्तान नौदल आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) नौदल यांनी कराची बंदरावर संयुक्त सराव सुरु केला आहे.

Pramod Yadav

Karachi Pakistan: पाकिस्तान नौदल आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) नौदल यांनी कराची बंदरावर संयुक्त सराव सुरु केला आहे. NDTV च्या रिपोर्टनुसार चीन आणि पाकिस्तानने आतापर्यंतचा सर्वात मोठा नौदल सराव सुरू केला आहे.

सी गार्डियन-३ असे या नौदल सरावाचे नाव आहे. त्याची सॅटेलाइट इमेज समोर आली आहेत. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. यामध्ये चीनच्या अनेक आघाडीच्या युद्धनौका, एक पाणबुडी आणि डॉकयार्ड कराची बंदरावर दिसत आहेत.

कराचीमध्ये तैनात असलेल्या चिनी नौदलाच्या मालमत्तेमध्ये टाइप 039 डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडीचा समावेश आहे. या पाणबुडीची नेमकी क्षमता अजून कळू शकलेली नाही. दरम्यान, अरबी समुद्राच्या पाण्यात बोटीचा एक अर्थ असा आहे की बीजिंग त्यांच्या बंदरांपासून अनेक हजार किलोमीटर दूर नौदल तैनात करण्यास सक्षम आहे.

सी गार्डियन-3 हा सरावाला अनेक अर्थ आहेत, चीनने अलिकडे हिंदी महासागरात त्यांचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढवला आहे. यामध्ये जिबूतीमधील प्रमुख तळाचे बांधकाम आणि प्रादेशिक नौदलाला अनेक आधुनिक प्लॅटफॉर्मची विक्री यांचाही समावेश आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी हिंद महासागरात चिनी हेरगिरीची अनेक जहाजेही सापडली होती मात्र, चीनने त्यांना सर्वेक्षण जहाज म्हटले होते. या महिन्याच्या सुरुवातीला चीनचे महासागर संशोधन जहाज 'शी यान 6' कोलंबोमध्ये थांबले होते. परंतु, पुढे जाण्यापूर्वी, ते तामिळनाडू किनारा आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दिशेने उत्तरेकडे सरकले.

चीनला संपूर्ण प्रदेशात पाणबुडीचे काम सुरू करायचे आहे, असे मानले जाते. त्यासाठी बंगालच्या उपसागरासह हिंदी महासागरात सक्रियपणे संधी निर्माण करण्याच्या शोधत सध्या चीन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Andre Russell World Record: टी20 क्रिकेटचा 'बादशाह'! 10,000 धावा आणि 500 विकेट्स घेणारा आंद्रे रसेल ठरला जगातील पहिला खेळाडू; मोडले जुने वर्ल्ड रेकॉर्ड

Shukra Gochar: शुक्राची कृपादृष्टी अन् पैशांचा पाऊस! 6 ते 22 नोव्हेंबरचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार छप्परफाड धनलाभ

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

Breast Cancer Screening: 2.15 लाख महिलांची तपासणी, 3,925 जणींमध्ये संशयित लक्षणे! गोव्यात 96 महिलांना स्तन कर्करोगाचे निदान

SCROLL FOR NEXT