Chinese Scientists Created 3 Carat Diamond Dainik Gomantak
ग्लोबल

चिनी शास्त्रज्ञांची कमाल! हाडे आणि फुलांपासून बनवला अनोखा हिरा; किंमत ऐकून तुम्हीही जाल चक्रावून

Manish Jadhav

Chinese Scientists Created 3 Carat Diamond Out Of Carbon Elements: तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन किती पुढे आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. या देशात छोट्याशा चिप्सपासून ते मोठ्या रोबोट्सपर्यंत सर्व काही बनवले जाते, ज्यामुळे लोकांचे काम सोपे होते. इथले शास्त्रज्ञ कधी कधी अशा गोष्टी तयार करतात, ज्या जगभरातील लोकांना विचार करायला भाग पाडतात. सध्या या देशातील शास्त्रज्ञांनी असेच काहीसे केले आहे. वास्तविक, चिनी वैज्ञानिकांनी अशा गोष्टींचा वापर करुन कृत्रिम हिरे बनवले आहेत ज्याचा तुम्ही विचारही करु शकत नाही.

ऑडिटी सेंट्रल या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञांनी विशेषत: लाल पेओनीपासून मिळवलेल्या कार्बन घटकांपासून 3-कॅरेटचा हिरा तयार केला आहे. पेओनी (Peony) चं एक फूल असतं, जे आशियापासून युरोप आणि पश्चिम उत्तर अमेरिकेत आढळते. या फुलाला ‘फुलांची राणी’ असेही म्हटले जाते आणि काही लोक याला रोमान्सचे प्रतीकही मानतात. गुलाबी, लाल, पिवळा, पांढरा, जांभळा आणि निळा अशा अनेक रंगांमध्ये हे फूल फुलते. चिनी शास्त्रज्ञांचा दावा आहे की, जगात पहिल्यांदाच पेओनी फुलाचा वापर करुन 'हिरा' बनवला गेला आहे.

या कंपनीने अनोखा हिरा बनवला

चीनच्या हेनान प्रांतातील लुओयांग येथे नुकतेच पेओनीपासून मिळालेल्या कार्बन घटकांपासून बनवलेल्या या जगातील पहिल्या हिऱ्याचे अनावरण करण्यात आले. हे लुओयांग नॅशनल पेओनी गार्डनला लुओयांग टाइम प्रॉमिस या सिंथेटिक डायमंड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने दान केले होते. रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यात Peony Garden ने डायमंड कंपनीला अद्वितीय हिरा बनवण्यासाठी लागणारे Peonies पुरवले होते, ज्यात जवळपास 50 वर्षांच्या पेओनीचा समावेश होता.

हिऱ्याची किंमत जाणून तुम्ही चकीत व्हाल!

लुओयांग टाइम प्रॉमिस कंपनीचे सीईओ वांग जिंग यांनी सांगितले की, या अनोख्या हिऱ्याची किंमत 3 लाख युआन म्हणजेच 35 लाख रुपये आहे. हा हिरा बायोजेनिक कार्बन एक्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी वापरुन उच्च तापमान आणि दाबावर बनवला आहे. तथापि, Peonies पासून मिळवलेल्या कार्बन घटकांचे हिऱ्यांमध्ये रुपांतर करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान खूपच गुंतागुंतीचे आहे. कंपनीने सांगितले की, केस, हाडे आणि फुलांमधील कार्बन घटक एका खास डिझाईन केलेल्या उपकरणामध्ये काढले जातात आणि ते घटक डायमंडच्या संरचनेत वापरले जातात. अशा प्रकारे हा अनोखा हिरा तयार झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT