India-China: हास्यास्पद दावा करत पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल भेटीबाबत चीनकडून संताप

India-China Crisis: चीनने असा दावा करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही भारतीय नेत्यांच्या अरुणाचल दौऱ्यादरम्यान चीनने खोटे दावे केले आहेत. भारताने हे दावे ठामपणे फेटाळले आहेत.
China On PM Modi's Arunachal Pradesh Visit
China On PM Modi's Arunachal Pradesh Visit
Published on: 
Updated on: 

China On PM Modi's Arunachal Pradesh Visit:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अरुणाचल प्रदेशचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले होते.

यातील सर्वात विशेष म्हणजे सर्वात लांब बोगदा सेला पास. 13000 फूट उंचीवर बांधलेला हा जगातील सर्वात उंच बोगदा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या अरुणाचल भेटीने आणि हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांमुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. मोदींच्या या भेटीबाबत चीनने भारताकडे निषेध नोंदवला आहे.

चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला हक्क सांगण्याचा खोटा दावा केला आहे आणि भारताच्या या कारवाईमुळे सीमा विवाद अधिकच गुंतागुंतीचा होईल असे म्हटले आहे.

चीनने असा दावा करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही भारतीय नेत्यांच्या अरुणाचल दौऱ्यादरम्यान चीनने खोटे दावे केले आहेत. भारताने हे दावे ठामपणे फेटाळले आहेत.

China On PM Modi's Arunachal Pradesh Visit
Haiti Violence: कॅरेबियन देश हैती हिंसाचाराच्या विळख्यात; अमेरिकेने दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले

नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर आक्षेप व्यक्त केला.

ते म्हणाले की, "जंगनान (अरुणाचल प्रदेश) हा चीनचा प्रदेश आहे. भारताने बेकायदेशीरपणे स्थापन केलेल्या तथाकथित अरुणाचल प्रदेशला चीनने कधीही मान्यता दिलेली नाही आणि त्याला ठामपणे विरोधही केला आहे. ते म्हणाले की, चीन-भारत सीमाप्रश्न अद्याप सुटलेला नाही. चीनच्या जंगनान क्षेत्राचा मनमानी पद्धतीने विकास करण्याचा भारताला अधिकार नाही."

China On PM Modi's Arunachal Pradesh Visit
Aseefa Bhutto Zardari: पाकिस्तानात बदलला रिवाज; मुलगी होणार देशाची 'फर्स्ट लेडी', कोण आहे आसिफा भुट्टो?

प्रवक्ते वांग वेनबिन पुढे म्हणाले की, "भारताच्या अशा हालचालींमुळे सीमा विवाद आणखी गुंतागुंतीचा होईल. भारत-चीन सीमेच्या पूर्वेकडील भागात भारतीय नेत्याच्या भेटीमुळे चीन असमाधानी आहे आणि त्याला विरोध करत असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी गेल्या शनिवारी अरुणाचल प्रदेशला भेट देत हजारो कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
PM Modi Digital India New Chapter
Goa Crime Rate Increase
Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dimagi Naxal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com