China's train in Tibet used for military mission near LAC  Dainik Gomantak
ग्लोबल

भारतीय सीमेजवळ चीनची हायस्पीड ट्रेन,सैन्य सशक्तीकरणासाठी नवी खेळी

चीनने (China) तिबेटमध्ये(Tibet) लष्करी हेतूंसाठी आपली पहिली हायस्पीड ट्रेन (China High speed Train) चालवली आहे.

Abhijeet Pote

चीनने (China) तिबेटमध्ये(Tibet) लष्करी हेतूंसाठी आपली पहिली हायस्पीड ट्रेन (China High speed Train) चालवली आहे.चीन सरकार नियंत्रित ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. ही हाय-स्पीड ट्रेन तिबेटची राजधानी ल्हासा (Lhasa), भारताच्या अरुणाचल प्रदेशजवळील(Arunachal Pradesh) निंगची या शहराशी जोडते (LAC). 3 जुलै रोजी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या ट्रेनने निंगकीला गेले होते , आणि ही त्यांची अनपेक्षित भेट होती.(China's train in Tibet used for military mission near LAC)

ही ट्रेन नुकतीच सुरू झाली आहे. सध्या, पीपल्स लिबरेशन आर्मीच्या कंबाइंड आर्म्स ब्रिगेडच्या रिक्रूट्सना याद्वारे पाठवून बोलावले जात आहे. लष्करी वापरासाठी चीनने इतक्या उंच भागात रेल्वेमार्ग विकसित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे भारतीय सीमेजवळ चिनी सैन्याची पोहोच मजबूत झाली आहे.

यामुळे चीन आता अगदी कमी वेळात तेथे सैन्य आणि जड शस्त्रे तैनात करू शकते. 2017 मध्ये डोकलाम वादानंतर चीनने भारताच्या सीमेजवळील भागात पायाभूत सुविधा विकसित करण्यास सुरुवात केली. हे काम 2020 नंतर अधिक तीव्र करण्यात आले आहे.

जुलैच्या दौऱ्यात जिनपिंग प्रथम ल्हासा येथे गेले आणि नंतर रेल्वेने निंगकीला गेले. चिनी राष्ट्राध्यक्षांचा तिबेटला हा पहिलाच दौरा होता. ल्हासा ते निंगची हा रेल्वे प्रवास 25 जून रोजी सुरू झाला. 435 किमी लांबीची ही रेल्वे विक्रमी वेळेत पूर्ण झाली आहे. ही ट्रेन 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT