China President Xi Jinping Dainik Gomantak
ग्लोबल

China Population Crisis: 'काम करु नका, मुलं जन्माला घाला...' चीनी सरकारचा फर्मान; लोकसंख्या वाढवण्याचा दिला आदेश

Chinese Government Marriage Incentives: घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत असलेला चीन आता तरुणांना लग्न करण्यासाठी आणि मुले जन्माला घालण्यासाठी विविध सवलती देत ​​आहे. देशातील अनेक प्रांतांमध्ये लग्नासाठीची रजा 3 दिवसांवरुन 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली.

Manish Jadhav

चीन सरकार आता आपल्या नागरिकांना उघडपणे नोकरी सोडा, लग्न करा आणि मुले जन्माला घाला असे सांगत आहे. घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत असलेला चीन आता तरुणांना लग्न करण्यासाठी आणि मुले जन्माला घालण्यासाठी विविध सवलती देत ​​आहे. देशातील अनेक प्रांतांमध्ये लग्नासाठीची रजा 3 दिवसांवरुन 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, चीनमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सिचुआन प्रांताने लग्नासाठीची रजा 3 वरुन 20 दिवसांपर्यंत वाढवली आहे. जर तुम्ही लग्नापूर्वी वैद्यकीय तपासणी केली तर तुम्हाला आणखी 5 दिवसांची रजा मिळेल. म्हणजे एकूण 25 दिवसांची पूर्ण पगारासह रजा मिळेल, असा प्रस्ताव सध्या जनतेसमोर ठेवण्यात आला आहे.

कन्फ्यूशियसची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांडोंग प्रांतातही लग्नाची रजा आता 18 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शांक्सी आणि गांसु सारख्या प्रांतांनी ती आणखी 30 दिवसांपर्यंत वाढवली आहे. सध्या, चीनमध्ये (China) केंद्रीय पातळीवर फक्त 3 दिवसांच्या लग्नाच्या रजेची तरतूद आहे, जी 1980 पासून लागू आहे. चीनमध्ये लग्न करणाऱ्यांची संख्या सतत कमी होत आहे. 2025 च्या पहिल्या तिमाहीत फक्त 1.81 दशलक्ष जोडप्यांनी त्यांच्या लग्नाची नोंदणी केली, जी गेल्या वर्षीपेक्षा 8 टक्क्यांनी कमी आहे. 2023 मध्ये थोडीशी वाढ झाल्यानंतर आकडेवारी पुन्हा घसरली आणि आता ही पातळी 1980 नंतरची सर्वात कमी आहे.

कमी विवाह, आणखी कमी मुले

कमी लग्नाचा थेट संबंध घटत्या जन्मदराशी आहे. तज्ञांच्या मते, आता तरुणांना तोपर्यंत लग्न करायचे नाही जोपर्यंत ते फॅमिली प्लॅन करत नाहीत. त्याशिवाय, अभ्यास आणि करिअरमधील व्यस्तता आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा विचार यामुळे पारंपारिक विवाहाची संकल्पना आणखी कमकुवत झाली आहे.

सरकार काय करत आहे?

दुसरीकडे, चीन विवाह नोंदणीची प्रक्रिया सोपी करत आहे. आता कोणत्याही शहरात विवाहाची (Marriage) नोंदणी करता येते, हुकोउ (घरगुती नोंदणी) ची आवश्यकता नाही. यासोबतच, प्रसूती आणि पितृत्व रजा देखील वाढवण्यात येत आहे. तथापि काही लोकांना भीती आहे की, आर्थिक दबावामुळे या सर्व रजा फक्त कागदावरच राहतील. हे लक्षात घेऊन सरकार कंपन्यांना मदत देण्याबद्दल देखील बोलत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT