China India Threat: पाकिस्तान नव्हे, भारताचा खरा शत्रू चीन! अमेरिकन गुप्तचर अहवालात धक्कादायत दावा, काय आहे Report? वाचा..

U.S. intelligence report: भारत-पाकिस्तान संघर्षानंतर सुरक्षा व्यवस्थेला हानी पोहोचवणारे राष्ट्र म्हणून भारत पाकिस्तानकडे पाहतो.
U.S. intelligence report on India-Pakistan-China
U.S. intelligence report on India-Pakistan-ChinaDainik Gomantak
Published on
Updated on

वॉशिंग्टन: ‘पाकिस्तान हा भारताकडे अस्तित्वासाठी धोका म्हणून पाहतो, तर भारत चीनला प्रमुख शत्रू मानतो आणि पाकिस्तानकडे सुरक्षा व्यवस्थेपुढील प्रमुख धोका म्हणून पाहतो,’ अशी निरीक्षणे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या जागतिक अहवालामध्ये नोंदविण्यात आली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षण प्राधान्यक्रमामध्ये जागतिक स्तरावरील नेतृत्व म्हणून प्रतिमा विस्तार करणे, चीनला रोखणे आणि भारताच्या सैन्यदलांची शक्ती वाढविणे यावर येत्या काळात लक्ष केंद्रित केले जाईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

भारत-पाकिस्तान संघर्षानंतर सुरक्षा व्यवस्थेला हानी पोहोचवणारे राष्ट्र म्हणून भारत पाकिस्तानकडे पाहतो, तर चीनकडे प्राथमिक प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो, असेही या अहवालात नमूद केले आहे. भारताने पाकमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.

U.S. intelligence report on India-Pakistan-China
Pakistan Currency: विभाजनानंतर एक वर्ष RBIने छापल्या होत्या पाकिस्तानी नोटा; काय होतं कारण?

अहवाल काय म्हणतो?

भारताकडून संरक्षण उत्पादनांसाठी देशांतर्गत व्यवस्थेची उभारणी

लष्कराच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया २०२४ पासून सुरू

अण्वस्त्रवाहू पाणबुडीद्वारे भारताने नौदलाचीही ताकद वाढविली

संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणखी वाढणार

U.S. intelligence report on India-Pakistan-China
Pakistan Inflation: भारताशी पंगा घेणं पाकड्यांना पडलं महागात; कर्जबाजारी पाकिस्तानात उडाला महागाईचा भडका

अशीही निरीक्षणे

सीमेपलीकडून निर्माण होणारी विविध आव्हाने, तेहरिके तालिबान पाकिस्तान, बलुचिस्तानातील विविध गट अशी अनेक आव्हाने पाकिस्तानसमोर असल्याचे हा अहवाल सांगतो. दहशतवाद्यांनी पाकिस्तानात २०२४ मध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचा बळी घेतला. पाकिस्तान भारताकडे अस्तित्वाला धोका म्हणून पाहतो, असे नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com