Stray Dogs Dainik Gomantak
ग्लोबल

China: चिनी लोकांचा काय भरोसा नाय! महिलेने भटकी कुत्री दत्तक घेतली नंतर शिजवून खाल्ली; व्हिडिओ केला शेअर

China Viral Video: भटक्या कुत्र्यांना एक सुरक्षित घर देण्यासाठी त्या प्रयत्न करत असल्याचा दावा करत त्यांनी नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

चीनमधून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांना दत्तक घेऊन नंतर त्यांना शिजवून खाल्ले असल्याचा भीषण प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर महिलेने याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावरुन शेअर केला आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. महिला प्राणी प्रेमी असल्याचा दावा करत लायोनिंग प्रांतातील नागरिकांना संपर्क साधत होती. भटक्या कुत्र्यांना एक सुरक्षित घर देण्यासाठी त्या प्रयत्न करत असल्याचा दावा करत त्यांनी नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन केले. कुत्रे मिळाल्यानंतर महिला त्यांना थेट किचनचा रस्ता दाखवत होती, असे या वृत्तात म्हटले आहे.

आलियास झीहुयान असे या महिलेचे नाव आहे. कुत्र्यांचे मांस शिजवल्याचा व्हिडिओ या महिलेने सोशल मिडियावरुन शेअर केला आहे. कुत्र्याचे मटण तयार आहे, पावसाच्या वातावरणात ड्रिंकसोबत घेण्यासाठी परफेक्ट आहे, असे कॅप्शन देत महिलेने व्हिडिओ शेअर केला आहे. तीचा लहान मुलगा हे मांस खाताना देखील व्हिडिओत दिसत आहे.

महिलेचा हा कारनामा समोर आल्यानंतर प्रांतातील सर्वांना माहिती देण्यात आली असून, महिलेला यापुढे कुत्रे दत्तक घेण्यासाठी देऊ नये, असे आवाहन प्राणी प्रेमी संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, चीनमध्ये कुत्रे खाणे अवैध नाही, पण महिलेच्या या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. महिलेच्या या कृतीमुळे पेट शॉप मालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकारावरुन सोशल मिडियावरुन देखील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. भटक्या कुत्र्यांना वाटले असेल त्यांना छान निवारा मिळतोय पण, त्यांना थेट नरकात पाठवले, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. आणखी एकाने प्राण्यांच्या सुरक्षेसाठी कायदे अधिक कठोर करण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Taxi: यापुढे 'लिव्‍ह अँड लायसन्‍स'वर नोंदणी नाही! व्यावसायिक वाहनांवर CM प्रमोद सावंतांचे स्पष्टीकरण; लवकरच परिपत्रक जारी होणार

Goa Taxi Issue: आता मडगाव-काणकोण टॅक्सीचालकांमध्‍ये संघर्ष, प्रकरण थेट पोलिसांत; एकमेकांची टॅक्‍सी रोखली

IFFI Goa 2025: पणजीत आजपासून 'इफ्‍फी'तरंग, उद्‌घाटन सोहळ्याला 'पास'ची गरज नाही

Baina Vasco Robbery Case: "गस्त वाढवा, त्यांच्या मुसक्या आवळ‍ा" बायणा-वास्कोतील दरोड्याप्रकरणी मुख्‍यमंत्र्यांचे पोलिसांना खडे बोल, दोन दिवस उलटले, पोलिसांचे हात अद्याप रितेच

Horoscope: विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस, प्रेमसंबंधातील वाद मिटणार; सर्व वयोगटातील राशींसाठी आजचा दिवस 'उत्तम'

SCROLL FOR NEXT