Quepem: होडर-कुडचडेत मातीच्या भरावामुळे झुआरी नदीचा फाटा बुजण्याची भीती, लोकांकडून पुराची शक्यता व्यक्त

Quepem Sewage Project: होडर-कुडचडे येथे हजारो ट्रक माती घालून मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू आहे. कालपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे ही माती वाहून झुआरी नदीच्या फाट्यात जात आहे.
Quepem
QuepemDainik Gomantak
Published on
Updated on

केपे : होडर-कुडचडे येथे हजारो ट्रक माती घालून मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू आहे. कालपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे ही माती वाहून झुआरी नदीच्या फाट्यात जात असल्याने हा फाटा बुजून जाण्याची भीती लोकांनी व्यक्त केली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून मलनिस्सारण वाहिनीचे काम कुडचडे मतदारसंघात सुरू असून या कामासाठी जागोजागी रस्तेही खोदून ठेवले असल्याने वाहनचालकांना याचा त्रास होत आहे.

Quepem
Goa Politics: "भविष्य सांगू नका, प्रशासन सांभाळा", काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर सडकून टीका

पूर्वी ज्या जागेवर हजारो खारफुटीची झाडे होती तिथे हजारो ट्रक माती घालून ती झाडे बुजवून टाकली आहेत. सध्या पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असल्याने होडर येथील झुआरी नदीच्या फाट्यातून भरपूर पाणी येत आहे.

Quepem
Corona In Goa: कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, वास्‍कोत सापडला नवीन कोविड रुग्‍ण, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 257 वर

लोकांकडून पुराची शक्यता व्यक्त

झुआरी नदीच्या फाट्याच्या काठावर मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामासाठी हजारो ट्रक माती घालून जागा केली आहे. ‘झुआरी’ नदीच्या फाट्यातून जाणाऱ्या पाण्याची वाट मुद्दामहून अडविण्यात आल्याने मोठा पूर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता पाऊस सुरू झाल्याने या फाट्याच्या काठावर असलेली माती फाट्यात जाऊन हा फाटा या पावसाळ्यात पूर्णपणे बुजून जाणार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com