Gaokao Exam Dainik Gomantak
ग्लोबल

Gaokao Exam: चीनच्या सर्वात कठीण परीक्षेत 27व्यांदा नापास झाला करोडपती; वयाच्या 56 व्या वर्षी हवा आहे विद्यापीठात प्रवेश

हा करोडपती अर्ज 1983 पासून करत आहे. Gaokao असे या परीक्षेचे नाव आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यंत अवघड मानले जाते.

Ashutosh Masgaunde

Millionaire failed for the 27th time in Gaokao Exam: जगभरातील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी खूप कठीण परीक्षा असतात. चीनमध्येही अशीच एक परीक्षा आहे, ज्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी एका करोडपतीने 27 वेळा प्रयत्न केला आहे.

चीनचे 56 वर्षीय करोडपती लियांग शी म्हणतात की, ते 27 व्यांदा त्यांच्या विद्यापीठ प्रवेश परीक्षेत नापास झाले आहेत. त्याला 750 पैकी फक्त 424 गुण मिळाल्याचे सांगितले. चीनमधील कोणत्याही विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या बेसलाइन स्कोअरपेक्षा हे त्यांना 34 गुण कमी मिळाले आहेत.

27 वेळा प्रयत्न

यावर्षी १.३ कोटी विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 1983 पासून, लियांग 27 वेळा परीक्षेला बसले आहेत. आपल्या निकालाने निराश झाल्याचे त्याने स्थानिक माध्यमांना सांगितले.

लिआंग निराशेने म्हणतो की, आता ते त्यांचे स्वप्न साकार करू शकतील की नाही याबद्दल त्यांना शंका आहे.

एका मीडिया चॅनलशी बोलताना ते म्हणाले, 'मला विश्वासच बसत नाही की मी यावेळही पास झालो नाही. मी आता खचलो आहे. चीनमध्ये होणाऱ्या या परीक्षेचे नाव आहे गाओकाओ.

Gaokao परीक्षा काय आहे?

चीनी विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही परीक्षा असते. इंग्रजी, गणित किंवा आवडीच्या कोणत्याही विषयात प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

चीन सरकारच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये केवळ 41.6 टक्के उमेदवारांना विद्यापीठात प्रवेश मिळाला. चीनमधील गाओकाओ पार केल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील लोकांसाठी गरिबीचे बंधन मोडले जाईल असे मानले जाते. कारण चीनमध्ये चांगल्या नोकरीसाठी चांगल्या विद्यापीठाची पदवी आवश्यक असते.

व्यवसायला सुरूवात

ही परीक्षा 1950 पासून चीनच्या शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. लिआंग यांच्या म्हणण्यानुसार, प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश आणि पदवी घेण्याचे स्वप्न त्यांनी नेहमीच पाहिले आहे.

1983 मध्ये ते पहिल्यांदा परीक्षेसाठी बसले तेव्हा 16 वर्षांचे होते. यानंतर ते अनेक नोकऱ्या करत राहिले, पण त्यांनी आपले शिक्षणाचे स्वप्न सोडले नाही.

90 च्या दशकात त्यांनी लाकडाचा घाऊक व्यवसाय सुरू केला, ज्यामध्ये ते खूप यशस्वी झाले. त्यांनी एका वर्षात 10 लाख युआन कमावले, जे आजच्या काळात 1.13 कोटी रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025: 'क्या रे भिडू, सब कुछ ठिक है ना...'! ‘रेड कार्पेट’वर जॅकीदांची हटके एंट्री; कमल हसन, मनोज वाजपेयीला पाहून चाहते खूश Video

Goa New Cricket Captain: गोवा T20 संघात मोठा बदल! हुकमी 'सुयश'कडे नेतृत्वाची धुरा; नवीन संघात कुणाला स्थान? पहा..

Baina Theft: 'पोलिसांनी शोधले असते तर, चोर सापडले असते'! बायणा दरोड्यातील जखमीचा धक्कादायक खुलासा; सांगितला संपूर्ण थरार

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी! आपची 22 नावे जाहीर; काँग्रेस-आरजी-फॉरवर्ड युतीचा होणार फैसला, भाजप लढवणार 50 जागा

Konkan Railway: शाळेच्या गणवेशात घरातून पळाला, बेपत्ता मुलगा रत्नागिरीत सापडला; 'मत्स्यगंधा एक्स्प्रेस'चा टीसी ठरला देवदूत

SCROLL FOR NEXT