Ban On Contesting Elections: मीडियाचा गैरवापर नडला! पंतप्रधान मोदींचे मित्र असलेल्या माजी राष्ट्रपतीवर निवडणूक लढविण्यास बंदी

Jair Bolsonaro: राजकारण जंगलाच्या कायद्याने चालत नाही. लोकशाहीने अनेक दशकांतील सर्वात कठीण परीक्षा पार केली आहे, असे ट्वीट कायदामंत्र्यांनी केले आहे.
Jair Bolsonaro
Jair BolsonaroDainik Gomantak
Published on
Updated on

Former President Jair Bolsonaro banned from contesting elections: ब्राझीलच्या सर्वोच्च निवडणूक न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना पुढील आठ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास मनाई केली आहे.

उजव्या विचारसरणीचे नेते असलेल्या बोल्सोनारो यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बोलसोनारो यांना गेल्या निवडणुकीत त्यांच्या शक्ती आणि माध्यमांचा गैरवापर केल्याबद्दल दोषी आढळले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यातील मैत्रीचे संबंध जगजाहीर आहेत. मे 2019 मध्ये मोदींनी पुन्हा निवडून आल्यानंतर भारताच्या प्रजासत्ताक दिन परेड आणि इतर समारंभांना पहिले आमंत्रण माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांना दिले होते.

बोलसोनारो यांच्यावरील आरोप

बोल्सोनारो यांना सातपैकी पाच न्यायाधीशांनी दोषी ठरवले आणि त्यांच्याविरुद्ध निकाल दिला. त्याच वेळी दोन न्यायाधीश बोलसोनारोच्या समर्थनार्थ होते.

या निर्णयामुळे 2026 च्या निवडणुकीत जैर बोल्सोनारोच्या पुनरागमनाच्या आशा संपल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुलै 2022 मध्ये बोल्सोनारो यांनी परदेशी राजदूतांसोबत बैठक घेतली होती.

या बैठकीत बाल्सोनारो यांनी ब्राझीलच्या निवडणूक व्यवस्थेबद्दल खोटे आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी पसरवल्याचा आरोप आहे आणि निवडणूक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विशेष म्हणजे ही बैठक यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात आली होती.

Jair Bolsonaro
फ्रान्समध्ये हिंसाचार, जाळपोळ अन् राष्ट्राध्यक्ष एन्जॉय करतायेत कॉन्सर्ट; व्हिडिओ व्हायरल

न्यायालयाच्या कारवाईनंतर कायदा मंत्री फ्लेवियो डिनो यांनी ट्विट केले की, सार्वजनिक काम करण्यासाठी खोटे बोलणे योग्य नाही.

ते म्हणाले की, राजकारण जंगलाच्या कायद्याने चालत नाही. लोकशाहीने अनेक दशकांतील सर्वात कठीण परीक्षा पार केली आहे.

ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे की, ते गुन्हेगारी कट्टरतावाद आणि देशाच्या सत्तेवर हल्ले सहन करणार नाहीत. तसेच दिशाभूल करणाऱ्या बातम्या, चुकीची माहिती खपवून घेतली जाणार नाही.
अलेक्झांड्रे डी मोरेस, बोल्सोनारो यांना दोषी ठरवलेल्या न्यायाधीशांच्या पॅनेलचे अध्यक्ष
Jair Bolsonaro
Israel Iran Tension: इस्रायल-इराण युद्धाच्या उंबरठ्यावर! इस्त्रायचा सीरियाच्या दोन एअरपोर्टवर हल्ला

बोल्सोनारो यांनी आपल्यावर लावलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. स्थानिक रेडिओ स्टेशनशी बोलताना बोल्सोनारो म्हणाले की, ते या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार आहेत.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जैर बोल्सोनारो त्यांचे प्रतिस्पर्धी लुला डी सिल्वा यांच्याकडून निकराच्या लढतीत पराभूत झाले.

निकालानंतर ब्राझीलमध्ये दंगल उसळली आणि बोलसोनारो समर्थकांनी 8 जानेवारी रोजी ब्राझीलच्या सरकारी इमारतींमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com