मुले जन्माला घालण्यासाठी सबसिडी, चीनच्या एका कंपनीची 32,000 कर्मचाऱ्यांसाठी मोठी योजना

चीन आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे
China Population
China PopulationDainik Gomantak
Published on
Updated on

चीनच्या एका कंपनीने आपल्या 32,000 कर्मचाऱ्यांना मुले जन्माला घालण्यासाठी 1,148 कोटी रुपयांची सबसिडी जाहीर केली आहे. Trip.com नावाची चीनी कंपनी जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीपैकी एक आहे. कंपनीने 1 अब्ज युआन (138 दशलक्ष डॉलर) ची नवीन चाइल्डकेअर सबसिडी सादर केली आहे.

भारतीय चलनात ही रक्कम 11,48,87,08,000 रुपये आहे. कंपनीत किमान तीन वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुलाच्या पहिल्या वाढदिवसापासून ते पाच वर्षांचे होईपर्यंत प्रत्येक नवजात बालकासाठी दरवर्षी 10,000 युआन किंवा 112,918 रुपये वार्षिक बोनस मिळेल. शनिवारपासून हे धोरण लागू होणार आहे.

ट्रिप डॉट कॉमचे कार्यकारी अध्यक्ष जेम्स लिआंग यांनी शुक्रवारी एका निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. नवीन बाल संगोपन धोरणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे आमचे ध्येय आहे. हे आमच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या व्यावसायिक उद्दिष्टे आणि यशाशी तडजोड न करता त्यांचे कुटुंब सुरू करण्यास किंवा वाढवण्यास प्रोत्साहन देईल.

चीन लोकसंख्या संकटाचा सामना करत असताना Trip.com ने ही घोषणा केली आहे. चीनमधील अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अशाच घोषणा केल्या आहेत.

चीनची लोकसंख्या 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच घटत आहे. चीनमध्ये 1000 लोकांमागे फक्त 6.77 जन्मदर आहे. 1949 मध्ये कम्युनिस्ट चीनच्या स्थापनेनंतरचा हा सर्वात कमी जन्मदर आहे.

China Population
चार कोटींच्या विमा रकमेसाठी मित्राची हत्या; अपघताचा केला बनाव, केस दाखल झाली अन् सर्व प्रकार आला समोर

संयुक्त राष्ट्रांच्या मते, चीन आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. यावर्षी भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे.

घटत्या जन्मदराचा मुद्दा हा चीनसाठी मोठा चिंतेचा विषय आहे, कारण त्याचा देशावर खोलवर परिणाम होऊ शकतो. यामुळे लोकसंख्येचे वय वाढणे अपेक्षित आहे, ज्यामुळे आर्थिक वाढीवर परिणाम होऊ शकतो.

Trip.com मध्ये तीन वर्षे काम केलेल्या सर्व पूर्णवेळ कर्मचारी लिंग, पद किंवा नोकरीचे स्थान विचारात न घेता बोनससाठी पात्र असतील. कंपनीच्या चीनी भाषेतील दुसर्‍या निवेदनात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com