Man swallowed 12cm chopstick China Dainik Gomantak
ग्लोबल

नशेचा अतिरेक! 8 वर्षे शरीरात होती 12 सेमी लांब चॉपस्टिक; वेदना असह्य झाल्यावर सत्य आलं समोर

Man swallowed 12cm chopstick China: चीनमधील लियाओनिंग प्रांतातील डेलियन येथे राहणाऱ्या 'वांग' नावाच्या व्यक्तीसोबत अशीच एक अजब आणि तितकीच भयानक घटना घडली आहे.

Sameer Amunekar

माणसाच्या आयुष्यात कधी कोणती घटना काय वळण घेईल, याचा नेम नाही. चीनमधील लियाओनिंग प्रांतातील डेलियन येथे राहणाऱ्या 'वांग' नावाच्या व्यक्तीसोबत अशीच एक अजब आणि तितकीच भयानक घटना घडली आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वी वांग हे मद्यधुंद अवस्थेत जेवण करत होते. नशेच्या भरात त्यांना भान राहिले नाही आणि अन्नासोबत त्यांनी चक्क १२ सेंटीमीटर लांब असलेली धातूची 'चॉपस्टिक' (Metal Chopstick) गिळली. ही सळई त्यांच्या गळ्यात अडकली, मात्र आश्चर्य म्हणजे त्यावेळी त्यांना श्वास घेण्यास फारसा त्रास झाला नाही.

शस्त्रक्रियेच्या भीतीने मृत्यूला दिले आमंत्रण घटनेनंतर वांग जेव्हा सुरुवातीला डॉक्टरांकडे गेले, तेव्हा डॉक्टरांनी तातडीने गळ्याला छेद देऊन (Surgery) ती चॉपस्टिक बाहेर काढण्याचा सल्ला दिला. परंतु, शस्त्रक्रिया आणि गळा कापला जाण्याच्या भीतीने वांग यांचे पाय लटपटू लागले. "गळा कापला तर माझा जीव जाईल," या एका अवाजवी भयापोटी त्यांनी उपचार न घेताच घरी जाण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेच्या भीतीपेक्षा त्यांनी आपल्या शरीरात ती लोखंडी सळई बाळगणे पसंत केले.

गेल्या आठ वर्षांत जेव्हा कधी त्यांना गळ्यात अस्वस्थ वाटायचे, तेव्हा ते मद्यपानाचे दुष्परिणाम असावेत असे समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे. मात्र, नुकतीच एक सकाळ त्यांच्यासाठी काळ बनून आली. झोपेतून उठल्यावर त्यांना गळ्यात असह्य वेदना सुरू झाल्या आणि साधी थुंकी गिळणेही कठीण झाले. वेदना सहन न झाल्याने त्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. तिथे जेव्हा डॉक्टरांनी त्यांचा 'एक्स-रे' (X-Ray) काढला, तेव्हा अहवाल पाहून डॉक्टरांचेही डोळे विस्फारले. वांग यांच्या गळ्याच्या टाळूमध्ये ती १२ सेमी लांब चॉपस्टिक तशीच अडकलेली होती.

वैद्यकीय चमत्कार आणि यशस्वी सुटका डॉक्टर हुआंग वेइपेंग यांच्यासाठी ही केस एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हती. इतक्या वर्षांत त्या धातूच्या तुकड्याने गळ्यातील कोणत्याही मुख्य रक्तवाहिनीला किंवा नसेला इजा पोहोचवली नव्हती, ही मोठी दिलासादायक बाब होती. वांग अजूनही शस्त्रक्रियेला तयार नव्हते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत्यूच्या धोक्याची जाणीव करून दिली आणि त्यांचे मन वळवले. अखेर एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर ती चॉपस्टिक यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आली. आता वांग पूर्णपणे धोक्याबाहेर असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT