Citizens  Dainik Gomantak
ग्लोबल

China: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा विस्फोट, सुमारे 2 करोड लोक लॉकडाऊनच्या छायेत

Corona: शांघायमध्ये एक महिन्यासाठी असाच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

पूर्वीच्या तुलनेत कोरोनाची भीती कमी झाली असेल, परंतु चीनमध्ये अजूनही भीती कायम आहे. चीन सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी एका मोठ्या शहरात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. सुमारे 2 करोड लोकसंख्या असलेल्या चेंगडू शहरात वाढती रुग्णसंख्या पाहता हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. चार दिवस लॉकडाऊन लावून न्यूक्लिक अ‍ॅसिड टेस्ट केली जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. शांघायमध्ये एक महिन्यासाठी असाच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.

लॉकडाऊनचा नियम काय?

चेंगडू ही दक्षिण-पश्चिम चीनमधील सिचुआन प्रांताची राजधानी आणि एक मोठे शहर आहे. बुधवारी शहरात कोरोनाचे (Corona) 106 नवीन रुग्ण आढळून आले, त्यापैकी 51 रुग्णांमध्ये लक्षणे आढळली नाहीत. शहरातील 381 हाय रिस्क एरिया ओळखण्यात आले आहेत. ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, लॉकडाऊन (Lockdown) काळात कुटुंबातील सदस्य दिवसातून एकदाच बाहेर जाऊ शकतो. तथापि, त्याच्याकडे निगेटिव्ह न्यूक्लिक चाचणी अहवाल असणे बंधनकारक आहे.

उड्डाणे रद्द

सरकारने चार दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी चार दिवसांनंतर हे निर्बंध हटवले जातील की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. ग्लोबल टाइम्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शहरातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनाचा विस्फोट वेगाने होत आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चेंगडू येथून उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. फ्लाइट मास्टरने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10 वाजेपर्यंत 398 उड्डाणे रद्द करण्यात आली. इतर विमानतळांवरील अनेक उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत.

दुसरीकडे, केवळ चेंगडू शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलेला नाही तर इतरही अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत. शेनझेन आणि ग्वांगझूमध्येही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिक (Citizens) चिंतेत आहेत. विशेषतः उत्पादन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT