Journalists Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमध्ये मीडियाच्या स्वातंत्र्याला ग्रहण, परदेशी पत्रकारांचा सरकारकडून होतोय छळ

मूळ चीन आणि हाँगकाँगमधील (Hong Kong) स्थानिक पत्रकारांनाही सर्व प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. चीनने FCC ला प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केले आहे.

दैनिक गोमन्तक

चीनमध्ये मीडियाच्या स्वातंत्र्याला ग्रहण लागले आहे. चीनमधील फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लब (FCC) च्या मतानुसार, पत्रकारांना शारीरिक छळ, हॅकिंग, ऑनलाइन ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. त्यांना व्हिसा नाकारण्यासारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागले आहे. मूळ चीन आणि हाँगकाँगमधील (Hong Kong) स्थानिक पत्रकारांनाही (Journalists) सर्व प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. चीनने FCC ला प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केले आहे. (China Is Harassing Foreign Journalists)

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांविरोधात आघाडी

बीजिंग हिवाळी ऑलिम्पिककडे (Beijing Winter Olympics) जगभरातील मीडियाचे लक्ष लागताच चीनने आंतरराष्ट्रीय माध्यमांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. शिनजियांग प्रांतातील मानवी हक्कांचे उल्लंघन आणि हाँगकाँगमधील दडपशाही धोरणांमुळे चीन आधीच जगभरात बदनाम आहे. अहवालानुसार, काही परदेशी पत्रकारांचा इतका छळ झाला आहे की, त्यांच्यावर चीन सोडण्याची वेळ आली आहे.

चीन सोडण्यास भाग पाडले

बीबीसीच्या वृत्तानुसार, अन्य पत्रकारांना आपत्कालीन परिस्थितीच्या कारणास्तव चीनमधून पळून जावे लागले. ऑस्ट्रेलियाचे चेंग ली आणि चीनचे नागरिक असलेले हेज फॅन यांना एक वर्षाहून अधिक काळासाठी तुरुंगात डांबण्यात आले आहे. चिनी प्रशासन इतर परदेशी पत्रकारांच्या कुटुंबियांना त्रास देत आहे.

त्याचवेळी एएनआयच्या वृत्तानुसार, स्थानिक मीडियाच्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, गेल्या वर्ष 2021 मध्ये प्रेसचे स्वातंत्र्य इतके धोक्यात आले होते की, त्याचा गेल्या दोन वर्षांचा रेकॉर्डही तुटला आहे.

पाकिस्तानचं रेकॉर्ड खूपच खराब

पाकिस्तान न्यूजपेपर एडिटर्स कौन्सिल (CPNE) च्या पाकिस्तान मीडिया फ्रीडम रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये (Pakistan) अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माहिती मिळविण्याचे स्वातंत्र्य नाही. 2021 मध्ये ड्यूटीवर असताना पाच पत्रकारांची हत्या झाली. या पत्रकारांपैकी नाझिम जोखियो या पत्रकाराचे अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT