pakistan pm anwaar ul haq kakar and iran president Dainik Gomantak
ग्लोबल

Iran Airstrike: इराण-पाकिस्तान संघर्षादरम्यान चीनचे आले वक्तव्य; ''दोन्ही देशांनी...''

Iran Missile Attack In Pakistan: इराणने मंगळवारी पाकिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ला केला.

Manish Jadhav

Iran Missile Attack In Pakistan: इराणने मंगळवारी पाकिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यानंतर ही संघटना जगभरात चर्चेत आली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने इराणमधील आपल्या राजदूताला परत बोलावले आहे. एवढेच नाही तर इराणचे पाकिस्तानातील राजदूत सध्या इराणमध्ये आहेत. त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, सध्या त्यांना पाकिस्तानात परतण्याची गरज नाही. याआधी मंगळवारी इराणने बलुचिस्तानमधील जैश अल-अदलच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले होते. पाकिस्तानने नंतर या हल्ल्यांची पुष्टी केली आणि दावा केला की, दोन मुले ठार आणि तीन जखमी झाले.

पाकिस्तान इराणवर नाराज

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, काल रात्री इराणने पाकिस्तानचे सार्वभौमत्व आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत चिथावणीखोर कारवाई केली आहे. इराणचे हे बेकायदेशीर पाऊल अजिबात मान्य नाही आणि ते कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरु शकत नाही. पाकिस्तानला कोणत्याही बेकायदेशीर कृतीला चोख प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. इराणने आपल्या कृतीचे परिणाम भोगण्यास तयार रहावे.

चीनने इराण आणि पाकिस्तानला सल्ला दिला

आता इराण आणि पाकिस्तानमधील घमासानादरम्यान चीनचे वक्तव्य आले आहे. चीनने दोन्ही देशांना संयम बाळगण्यास सांगितले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्यास, तणाव आणि चिथावणी देणारी कोणतीही कृती टाळण्यास आणि शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी काम करण्यास सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले की, आम्ही इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना जवळचे शेजारी मानतो आणि दोन्ही मोठे इस्लामिक देश आहेत, त्यामुळे दोन्ही देशांनी चिथावणीखोर कारवायांपासून दूर राहिले पाहिजे. निंग पुढे असेही म्हणाले की, इराण आणि पाकिस्तान हे दोन्ही चीनच्या जवळ आहेत आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे (SCO) सदस्य आहेत.

दुसरीकडे, इराणचा हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा मध्यपूर्वेतील संकट अधिक गडद होत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरुच आहे. ज्या दहशतवादी संघटनेला इराणने लक्ष्य केले आहे, त्याचे दहशतवादी इराण-पाकिस्तान सीमेवर दररोज पाकिस्तानी सैनिकांना लक्ष्य करत आहेत. या हल्ल्याची माहिती देताना इराणच्या वृत्तसंस्थेने सांगितले की, या हल्ल्यात जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेला खास लक्ष्य करण्यात आले होते. इराणने दहशतवाद्यांचे दोन गड यशस्वीपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.

जैश अल अदल ही 600 दहशतवाद्यांची संघटना आहे

जैश-अल-अदल म्हणजेच "न्याय दल" हा 2012 मध्ये स्थापन झालेला एक सुन्नी दहशतवादी गट आहे जो मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमध्ये कार्यरत आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये कार्यरत असलेली ही दहशतवादी संघटना इराण आणि पाकिस्तानच्या सीमेवर सक्रिय आहे. त्यामुळेच ही संघटना दोन्ही सरकारांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अमेरिका आणि इराण या दोघांनीही या संघटनेला दहशतवादी घोषित केले आहे. या सुन्नी संघटनेत 500 ते 600 दहशतवादी आहेत. गेल्या महिन्यात, इराणचे मंत्री अहमद वाहिदी यांच्या म्हणण्यानुसार, आग्नेय प्रांतातील सिस्तान-बलुचिस्तानमधील एका पोलिस स्टेशनवर रात्रीच्या वेळी झालेल्या हल्ल्यात 11 इराणी पोलिस अधिकारी मारले गेले होते. या घटनेसाठी इराणने जैश-अल-अदलला जबाबदार धरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT