China Taiwan Dainik Gomantak
ग्लोबल

China Taiwan: चीन आणि तैवानमध्ये वाढला तणाव, व्यक्त केली जातेय युद्धाची भीती!

चीन आणि तैवान यांच्यातील सततच्या वाढत्या तणावामुळे या भागात युद्धाची शक्यता बळावली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

चीन आणि तैवान यांच्यातील सततच्या वाढत्या तणावामुळे या भागात युद्धाची शक्यता बळावली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार, चीन उत्तर तैवानचे हवाई क्षेत्र बंद करण्याच्या योजनेवर विचार करत आहे.

16 ते 18 एप्रिल दरम्यान चीन तैवानवर हवाई बंदी लादणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे या प्रदेशातील उड्डाणे विस्कळीत होतील.

रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. या निर्बंधांमुळे तैवानच्या उत्तरेकडील उड्डाण माहिती क्षेत्रामध्ये व्यत्यय येईल. चीन अनेक दिवसांपासून स्वशासित तैवानच्या आसपास भीषण लष्करी प्रशिक्षण घेत आहे, अशात नो फ्लाय झोन तयार करण्याच्या बातम्या समोर येत आहेत.

चीनने आता हल्ल्याची तयारी पूर्ण केली असल्याचे तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले आहे. तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी नुकतीच कॅलिफोर्नियामध्ये यूएस हाऊसचे अध्यक्ष केविन मॅकार्थी यांच्याशी भेट घेतली. या बैठकीमुळे चीन संतप्त झाला आहे.

नो-फ्लाय झोनचा ईशान्य आशिया आणि आग्नेय आशियामधील 60 टक्के-70 टक्के उड्डाणांवर तसेच तैवान आणि दक्षिण कोरिया, जपान आणि उत्तर अमेरिका यांच्यातील उड्डाणांवर परिणाम होईल. असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले.

तैवान सध्या या तथ्यांमधील सत्यता तपासत आहेत. चीनच्या युद्धनौका आणि लढाऊ विमाने अजूनही तैवान सीमेजवळ घिरट्या घालत आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की ते सतत चिनी सैनिकांवर नजर ठेवत आहेत. चीनने शनिवारी स्वशासित तैवानभोवती तीन दिवसीय लष्करी सराव सुरू केला, लक्ष्यित हल्ल्यांवर लक्ष केंद्रित केले आणि बेटाची नाकेबंदी सराव केला.

तैवानभोवती मोठ्या प्रमाणात लष्करी कवायती करणे हा तटीय राष्ट्रासाठी “कठोर इशारा” आहे. "पीपल्स लिबरेशन आर्मीने अलीकडे तैवान सामुद्रधुनी आणि आसपासच्या सागरी भागात अनेक सराव केले, ज्यात तैवानच्या स्वातंत्र्य समर्थक फुटीरतावादी शक्ती आणि बाह्य शक्तींची मिलीभगत आणि संगनमत दिसून येते." असे चीनच्या तैवान अफेयर्स ऑफिसचे प्रवक्ते झू फेंगलियन म्हणाले.

“देशाचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी ही आवश्यक कारवाई आहे.” चीनचा तीन दिवसांचा व्यापक सराव सोमवारी संपला. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर केविन मॅकार्थी यांनी गेल्या आठवड्यात कॅलिफोर्नियामध्ये तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांची भेट घेतल्यानंतर चीनने हा हल्ला केला. असे झू फेंगलियन म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: 17 तासानंतर अनमोड घाटातील कोंडी फुटली; बेळगाव-गोवा मार्ग वाहतुकीस खुला

वडाच्या झाडाखाली माडांच्या झावळ्यांचा मंडप, गोव्यात पार पडला प्रस्थापित रिवाजांना फाटा देणारा धनगरी लग्नसोहळा

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

SCROLL FOR NEXT