China Dam Brahmaputra Dainik Gomantak
ग्लोबल

China’s Mega Dam: चीनचा 'वॉटरबॉम्ब' भारतासाठी धोकादायक? ब्रह्मपुत्रेवर जगातील सर्वांत मोठ्या धरणाचे काम सुरू; 167 अब्ज डॉलर खर्च

China Dam Brahmaputra: ब्रह्मपुत्रा नदीवर तिबेटमध्ये बांधण्यात येणाऱ्या जगातील सर्वांत मोठ्या धरणाचे काम चीनने सुरू केले असून, हे धरण अरुणाचल प्रदेशात भारताच्या सीमेजवळ आहे.

Sameer Panditrao

China Brahmaputra Dam: ब्रह्मपुत्रा नदीवर तिबेटमध्ये बांधण्यात येणाऱ्या जगातील सर्वांत मोठ्या धरणाचे काम चीनने सुरू केले असून, हे धरण अरुणाचल प्रदेशात भारताच्या सीमेजवळ आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १६७.८ अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित आहे. चीनचे पंतप्रधान लि कियांग यांनी या प्रकल्पाचे काम सुरू केल्याचे सांगितले असून, त्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजनही केल्याचे सांगितले.

या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यानंतरही या प्रकल्पाचे काम चीनने सुरू केले आहे. चीनने डिसेंबर २०२४ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या प्रकल्पाला ‘वॉटर बॉम्ब’ असे नाव दिले होते आणि तो भारतासाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते.

तिबेटची ढाल

अरुणाचल प्रदेशातील निंगची या जवळच्या भागात प्रकल्पाच्या सुरुवातीपूर्वीचा सोहळा पार पडला. सरकारी झिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, उत्पादित वीज प्रामुख्याने इतर प्रदेशांतील वापरासाठी पुरवली जाईल आणि तिबेटमधील स्थानिक विजेच्या गरजा पूर्ण करण्यासही मदत होईल. शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या धरणातून निघालेल्या विजेचा वापर होईल, असे सांगण्यात आले असून, या प्रकल्पासाठी तिबेटची ढाल चीनने पुढे केली असल्याचे म्हटले जाते. सन २०२३ मधील एका अहवालानुसार, हे जलविद्युत केंद्र दर वर्षी ३०० अब्ज किलोवॉटहून अधिक वीजनिर्मिती करणार आहे.

काय आहे प्रकल्प?

या बांधकामात पाच जलविद्युत केंद्रांचा समावेश असेल, अशी माहिती चीनमधील माध्यमांनी दिली असून, या संपूर्ण प्रकल्पावर चीन अंदाजे १६७ अब्ज डॉलर खर्च करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे धरण यांग्त्झी नदीवरील ‘थ्री गॉर्जेस’ धरणापेक्षा अधिक वीजनिर्मिती करू शकेल, असे सांगितले जात आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पामुळे ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह आणि पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. भारताने या वर्षाच्या सुरुवातीला या प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली होती. या प्रकल्पामुळे ब्रह्मपुत्रेच्या खालील भूभागात हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.

भारत, बांगलादेशसाठी डोकेदुखी

चीनचे हे पाऊल बांगलादेशसाठीही डोकेदुखी ठरणार आहे. ब्रह्मपुत्रा हिमालयाच्या उत्तरेस तिबेटच्या पुरंग जिल्ह्यातील मानसरोवर तलावाजवळ उगम पावते आणि भारत आणि बांगलादेशातून वाहते. भारत आणि चीन यांच्यात झालेल्या परराष्ट्र सचिव-उपपरराष्ट्रमंत्री बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही या प्रकल्पाला ‘वॉटर बॉम्ब’ असे म्हटले होते. चीनने आंतरराष्ट्रीय जलकरारावर स्वाक्षरी केली नसल्याने चीनच्या भूमिकेवर विश्वास ठेवता येणार नाही. चीन आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा प्रकल्प लष्करी धोक्यापेक्षा मोठा आहे, असे ते म्हणाले.

FAQs

Q1. चीनमधील सर्वात मोठे धरण कोणते?

A.1उत्तर: चीनमधील सर्वात मोठे धरण 'थ्री गॉर्जेस धरण' (Three Gorges Dam) आहे.

Q2. थ्री गॉर्जेस धरणाची क्षमता किती आहे?

A2: थ्री गॉर्जेस धरणाची जलविद्युत उत्पादन क्षमता २२,५०० मेगावॅट आहे.

Q3. जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

A3. जगातील सर्वात मोठे धरण अमेरिकेतील 'ग्रँडली' धरण आहे, जे कोलंबिया नदीवर बांधलेले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंडिगोच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; गोवा-इंदूर फ्लाईटची हायड्रॉलिक सिस्टीम लँड होण्यापूर्वी बिघडली, 140 प्रवाशांनी रोखले श्वास

Jagdeep Dhankhar Resigns: जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा; दिलं 'हे' कारण

Mumbai Goa Highway: 'कोकणच्या माणसाची कोणाला पडलेलीच नाहीय...', महामार्गावर खड्डेच खड्डे; मनसे नेत्यानं शेअर केला Video

IND vs ENG 4th Test: इंग्लंडमध्ये जस्सी बनणार किंग! 'हॅटट्रिक'सह बुमराह रचणार नवा रेकॉर्ड; दिग्गजाला सोडणार मागे

VIDEO: बंद खोलीतून आवाज ऐकून दरवाजा उघडला, आत पाहताच नवरा थक्क!

SCROLL FOR NEXT