Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

Carpe Diem Art Gallery Majorda: माजोर्डा येथील कार्पे दिएम कलादालनात ज्येष्ठ चित्रकार प्रवीण नाईक यांच्या ‘अनरिटन होरायझन’ या कला प्रदर्शनाची सुरुवात उत्साहात झाली.
Praveen Naik Unwritten Horizon | Carpe Diem Art Gallery Majorda
Praveen Naik Unwritten Horizon | Carpe Diem Art Gallery MajordaDainik Gomantak
Published on
Updated on

माजोर्डा येथील कार्पे दिएम कलादालनात ज्येष्ठ चित्रकार प्रवीण नाईक यांच्या ‘अनरिटन होरायझन’ या कला प्रदर्शनाची सुरुवात उत्साहात झाली. गोव्यातील अनेक प्रसिद्ध चित्रकार आणि चित्ररसीक या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. प्रवीण नाईक यांच्या सर्जनशील प्रवासात कला इतिहासक आणि क्युरेटर अपूर्व कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले आहे. या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी प्रदर्शनाबद्दल आणि प्रवीण नाईक यांच्याबद्दल विचारप्रवर्तक भावना प्रकट केल्या. 

या प्रदर्शनातील प्रत्येक कलाकृती अर्थपूर्ण आशय व्यक्त करणारी आहे. हे प्रदर्शन 7 डिसेंबर 2025पर्यंत बुधवार ते रविवार या दिवसात सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत लोकांसाठी खुले राहील. 

अपूर्व कुलकर्णी, कला इतिहास अभ्यासक

‘अनरिटन होरायझन’ हे अतिशय सुंदर काव्यात्मक शीर्षक आहे आणि ते काहीही न बोलता बरेच काही सांगून जाते. कलाकाराच्या अवचेतन अवस्थेतून हे होरायझन (क्षितिज) निर्माण होत असते.‌

Praveen Naik Unwritten Horizon | Carpe Diem Art Gallery Majorda
Museum of Goa Exhibition: ख्रिसमस ट्री, नरकासुर, माटोळी; गोव्यातील उत्सवांचा आरसा

या अज्ञात प्रदेशाला जाणून घ्यायचे असेल तर या चित्रांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा एक विशिष्ट दृष्टिकोन असू शकतो असे प्रवीण सुचित करतात. हा अज्ञात भूप्रदेश आहे ज्याचे भूरेखांकन (मॅपिंग) अजून झालेले नाही.  कलाकार हे भविष्याचा निर्देश करणारे असतात. आपला गोवा काय होता आणि तो काय बाकी राहिला आहे हे त्यांच्या निर्मितीतून आपल्याला जाणून घेता येईल.

Praveen Naik Unwritten Horizon | Carpe Diem Art Gallery Majorda
Stone Exhibition: दगडात शोधला 'देव'! पर्येच्या परेशने भरवले अनोखे प्रदर्शन

ही चित्रे खूप ताकदवान आहेत, त्यातील विडंबन स्पष्ट दिसते. पणजीच्या विशिष्ट रस्त्याला आपण आता 'कॅसिनो रोड' म्हटले तर ते हरवलेल्या गोव्याचे किंवा सध्या गोवा काय बात चालला आहे याचे रूपकात्मक शीर्षक असू शकते आणि स्पष्टपणे तसे म्हणणे खूप धाडसाचे असेल. त्यासाठी, मला वाटते आपल्यापैकी प्रत्येकला प्रवीणच्या कामाबद्दल मत बनवणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com