IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

UNESCO Gandhi Medal IFFI: शांतता आणि आंतर-सांस्कृतिक संवादांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि महात्मा गांधींच्या अहिंसेच्या आणी शांततेच्या तत्त्वाचा सन्मान करणाऱ्या उत्कृष्ट चित्रपटाला हा पुरस्कार दिला जातो.
Goa IFFI 2025
Goa IFFI 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

सोळाव्या इफ्फीपासून आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक महोत्सवात प्रदान व्हायला सुरुवात झाली. शांतता आणि आंतर-सांस्कृतिक संवादांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि महात्मा गांधींच्या अहिंसेच्या आणी शांततेच्या तत्त्वाचा सन्मान करणाऱ्या उत्कृष्ट चित्रपटाला हा पुरस्कार दिला जातो. युनेस्कोच्या तत्वाखाली, आयसीएफटी पॅरिसच्या सहकार्याने प्रदान करण्यात येणारा तो आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. या विभागात स्पर्धा करण्यासाठी दरवर्षी 10 चित्रपट निवडले जातात. 

'द प्रेसिडेंट केक'

यंदा या विभागात कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये डायरेक्टर्स फोर्ट नाईट विभागात कॅमेरा डी’ऑर आणि प्रेक्षकांचा विशेष पुरस्कार लाभलेल्या, इराकी चित्रपट दिग्दर्शक हसन हादी यांच्या 'द प्रेसिडेंट केक' या चित्रपटाचा समावेश आहे. ऑस्कर पुरस्कारासाठी इराकचे प्रतिनिधित्व यंदा हा चित्रपट करत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रतिनिधी उड्या टाकतील यात शंका नाही.

हा चित्रपट इराक मधील नऊ वर्षांच्या लामियाची कथा सांगतो. राजकीय अशांततेदरम्यान संयुक्त राष्ट्रांनी घातलेल्या अन्ननिर्बंधाच्या काळात राष्ट्रपतींच्या वाढदिवसाच्या केक बेक करण्यासाठी होणारी तिची धावपळ या चित्रपटात दाखवली गेली आहे. 

सेफ हाऊस 

दिग्दर्शक एरिक स्वेंसन्स

२०१३ च्या आफ्रिकन रिपब्लिकच्या गृह-संघर्षादरम्यान डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स रुग्णालयात १५ तास जी वेदनादायक घटना घडते ती हा चित्रपट दाखवतो. गोटेबर्ग चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट नॉर्डीक चित्रपटासाठी या चित्रपटाला ऑडियन्स ड्रॅगन पुरस्कार मिळाला आहे.

तन्वी द ग्रेट 

दिग्दर्शक अनुपम खेर 

ऑटिझम असलेल्या एका मुलीने सियाचीन ग्लेशियरवर ध्वजवंदन करण्याचे, तिच्या दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प सोडला आहे.

याकुशीमास इल्युजन

दिग्दर्शक कावासी निओमी

हे एक अस्तित्ववादी नाट्य आहे.‌ जपानमधील एक फ्रेंच प्रत्यारोपण समन्वयक तिच्या हरवलेल्या जोडीदाराचा शोध घेत आहे, जो आता ‘जोहात्सू’ (जपान मधील दरवर्षी हजारो बेपत्ता होणाऱ्यांपैकी एक) झाला आहे. लोकांना चित्रपट महोत्सवात प्रीमियर झालेल्या या चित्रपटाला गोल्डन लेपर्ड नामांकन मिळाले होते. 

के पॉपर  

दिग्दर्शक इब्राहिम जमिनी

के पॉप आयडॉलची वेड असलेली एक इराणी किशोरवयीन मुलगी आई नकार देत असतानाही सोलला प्रवास करण्याचे स्वप्न पाहत आहे. टॅलीन ब्लॅक नाईटमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन झाले आहे. 

Goa IFFI 2025
World Premiere of Claudia: ‘क्लावडिया’ चा वर्ल्ड प्रिमियर IFFI मध्ये कुठे पाहाल? पहा Video

या विभागातले इतर चित्रपट 

द वेव्ह 

दिग्दर्शक सेबेस्टियन ललिओ 

हा चित्रपट २०१८ मधील चिलीतील स्त्रीवादी मोर्चांपासून प्रेरित आहे. कान्स चित्रपट महोत्सवात या सिनेमाचा प्रीमियर झाला होता. 

ब्राईड्स 

दिग्दर्शिका नादिया फॉल्स 

ही दोन ब्रिटिश मुस्लिम किशोरवयीन मुलींची कथा आहे ज्या कट्टरतावादाशी सामना करत आहेत. सनडान्स चित्रपट महोत्सवात वर्ल्ड सिनेमा ड्रॅमेटिक विभागात ग्रँड ज्युरी पारितोषिकासाठी या चित्रपटाला नामांकन मिळाले होते. 

Goa IFFI 2025
IFFI 2025 Opening: ब्राझिलियन चित्रपट ‘द ब्लू ट्रेल’ने उघडणार इफ्फीचा पडदा! काय असणार रूपरेषा; गोव्यातला फिल्म्स कोणत्या? पहा Video

हाना 

दिग्दर्शक उज्कान हायसाज 

कोसोवोमधल्या महिला पुनर्वसन केंद्रातील कला चिकित्सा कार्यक्रमात सामील झालेला एक अभिनेता युद्धातून वाचलेल्यांना त्यांच्या वेदनांचे रूपांतर अभिव्यक्तीत करण्यात मदत करतो. इफीमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर होत आहे. 

व्हाईट स्नो 

दिग्दर्शक प्रवीण मोरछाले

एका तरुण चित्रपट निर्मात्याची यात गोष्ट सांगितली गेली आहे ज्याच्या चित्रपटावर धार्मिक नेत्याने बंदी जाहीर केली आहे. 

विमुक्त 

दिग्दर्शक जितांक सिंग गुर्जर 

हा ब्रज भाषेतील चित्रपट आहे. एक वृद्ध जोडप्याची ही गोष्ट आहे, जे त्यांच्या बौद्धिकदृष्ट्या कमकुवत मुलाला महाकुंभ महोत्सवात घेऊन चालले आहे.‌

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com