Chinese Spy Balloon Dainik Gomantak
ग्लोबल

Chinese Spy Balloon: 'स्पाय बलून' पाडल्याने चीन संतापला; अमेरिकेला दिली धमकी...

आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे चीनचे प्रतिपादन

Akshay Nirmale

Chinese Spy Balloon: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या हवाई हद्दीत दिसणारा चीनचा 'स्पाय बलून' अखेर अमेरिकेने खाली पाडला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा आदेश मिळताच अमेरिकेच्या हवाई दलाने उच्च तंत्रज्ञानाच्या F-22 रॅप्टर विमानाच्या मदतीने चिनी बलून खाला पाडला. फुगा खाली आणण्यासाठी सिंगल साइडवाइंडर क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

या बलुनच्या नाशामुळे कोणालाही इजा झाली नाही. अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनाच्या किनारपट्टीपासून सुमारे 9.6 किलोमीटर (6 मैल) अंतरावर अटलांटिक महासागरात तो खाली पाडण्यात आला. अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील लँगली हवाई दलाच्या तळावरून फायटर एअरक्राफ्टने स्पाय बलून खाली पाडण्यासाठी उड्डाण केले होते.

अमेरिकेच्या या कारवाईमुळे चीन चांगलाच संतापला आहे. याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, 'अमेरिकेने हा प्रश्न शांततेने सोडवावा अशी आमची इच्छा होती.

पण अमेरिकेने आमचे नागरी हवाई जहाज (स्पाय बलून) खाली पाडले. याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. अमेरिकेने ही कृती करून आंतरराष्ट्रीय मानकांचे उल्लंघन केले आहे. चीन आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

याबाबत आम्ही अमेरिकेशी अनेकदा चर्चा केली. आम्ही त्यांना सांगितले की आमचे नागरी हवाई जहाज चुकून अमेरिकेच्या हवाई हद्दीत घुसले होते, हा फक्त एक अपघात होता. या बलूनपासून अमेरिकेला कोणताही लष्करी धोका नाही, असे आम्ही यापूर्वीही सांगितले होते.

चीनचा गुप्तचर फुगा पाडल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे वक्तव्यही आले आहे. बायडेन म्हणाले, 'अमेरिकेचे लक्ष आता ढिगारा सावरण्यावर आहे. टीमसह घटनास्थळी पोहोचलेल्या जहाजांमध्ये पाणबुडे तसेच एफबीआय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या मोहिमेत अमेरिकेने काही मानवरहित जहाजेही तैनात केली आहेत.

अमेरिका चीनच्या या 'स्पाय बलून'चा बराच काळ मागोवा घेत होती. 28 जानेवारीला हा फुगा अलास्कामध्ये दाखल झाला. येथून 30 जानेवारी रोजी बलूनने कॅनडाच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला. 31 जानेवारी रोजी कॅनडातून पुन्हा अमेरिकन हवाई हद्दीत प्रवेश केला होता.

अमेरिका, कॅनडा आणि लॅटिन अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात चीनचा संशयित स्पाय बलून दिसल्यानंतर खळबळ उडाली होती. अमेरिकेच्या मोंटाना राज्यावर दिसलेल्या फुग्याचा आकार तीन बसेस इतका होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Song: एक कर्मयोगी जो... मोदींवर आलं मराठी गाणं; अजय-अतुलनं दिलं संगीत; प्रमोद सावंतांनी शेअर केला व्हिडिओ Watch Video

ICC T20 क्रमवारीत मोठा फेरबदल! अभिषेक शर्मा नंबर 1 वर कायम तर सूर्या-तिलक वर्मा यांची घसरण

Goa Drug Bust: थिवी रेल्वे स्थानकावर 3.5 लाखांचा अंमली पदार्थ जप्त, 25 वर्षीय नेपाळी नागरिकाला अटक; कोलवाळ पोलिसांची कारवाई

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

SCROLL FOR NEXT