Pakistan: 'लघवी येणचं बंद झालं, भारताला धमकी देणाऱ्या PAK च्या मंत्र्याची दयनीय अवस्था

Pakistan Crisis: बालाकोटवर भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर याच पाकिस्तानी नेत्याने जल्लोष केला होता.
 Sheikh Rashid
Sheikh RashidDainik Gomantak
Published on
Updated on

Former Minister Of Pakistan Muslim Sheikh Rashid: पाकिस्तानचे पूर्व मंत्री मुस्लिम शेख रशीद यांच्याबाबत अशी बातमी समोर येत आहे, ज्याबद्दल तुम्हाला हसू आवरता येणार नाही. बालाकोटवर भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर याच पाकिस्तानी नेत्याने जल्लोष केला होता.

आमच्याकडे अणुबॉम्ब असून भारतावर आम्ही कधीही हल्ला करु शकतो, असे शेख रशीद म्हणाले होते. पण आता हे माजी मंत्री इतके घाबरले आहेत की, त्यांनीच ‘माझी लघवी थांबली आहे’, असे म्हटले आहे.

वास्तविक, माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यावर माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा खोटा आरोप केल्याप्रकरणी शेख यांना अटक करण्यात आली. यादरम्यान त्यांना लघवी तपासणीसाठी रुग्णालयात (Hospital) नमुना देण्यास सांगितले जात होते. त्यावेळी ते म्हणाले की, 'माझी लघवी थांबली, तर मी नमुना कसा देऊ.' शेख रशीद यांचे हे उत्तर ऐकून पोलीसही चकित झाले.

 Sheikh Rashid
Pakistan: कंगाल पाकिस्तान उद्या साजरा करणार काश्मीर एकता दिवस, जनता बेहाल...!

दुसरीकडे, शेख रशीद हे इम्रान खान यांचे निकवर्तीय मानले जातात. त्यांनी अलीकडेच एका रॅलीदरम्यान इम्रान खान यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्यात माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचा हात असल्याचा आरोप केला होता. या खोट्या आरोपावरुन त्यांना अटक करण्यात आली. पकले गेले तेव्हा माजी मंत्री मद्यधुंद अवस्थेत होते, असा दावा पाकिस्तान पोलिसांनी (Police) केला आहे.

विशेष म्हणजे, त्यांच्याकडून अवैध शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय दारुही जप्त करण्यात आली आहे. मात्र, शेख रशीद यांनी पोलिसांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे सत्यता जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले आणि तिथे लघवीचे नमुने देण्यास सांगितले.

 Sheikh Rashid
Pakistan Economic Crisis: जिन्नांच्या पाकिस्तानला IMF कडून 'जोर का झटका', देश उध्वस्त होण्याच्या मार्गावर...

जेणेकरुन, अल्कोहोल घेणे किंवा न घेणे याची चाचणी कळू शकेल. मात्र, यावेळी मंत्रीमहोदय खूपच घाबरलेले दिसले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ते असे म्हणताना दिसत आहेत की, 'माझी लघवी होत नसेल तर मी नमुना कसा देऊ.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com