Chinese Spy Balloon: चीनचा स्पाय बलून अमेरिकेने अटलांटिक महासागरात पाडला...

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या मंजुरीनंतर अमेरिकन लष्कराची कारवाई
Chinese Spy Balloon
Chinese Spy BalloonDainik Gomantak
Published on
Updated on

Chinese Spy Balloon: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या आसमंतात दिसणारा चीनचा स्पाय बलून खाली पाडण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. हा बलून समुद्रावर पाडण्यात आला असून आता अमेरिकेची तपासपथके घटनास्थळी जाऊन त्याचा ढिगारा उचलत आहेत.

Chinese Spy Balloon
Watch: कंगाल पाकिस्तानात धर्मांधतेचा कळस! मशिदीवर खुलेआम हल्ले...

हा बलून पाडण्यापूर्वी तीन विमानतळे बंद केली गेली होती. या परिसरातील हवाई क्षेत्रही वाहतुकीसाठी बंद ठेवले गेले होते. त्यानंतर अमेरिकन लष्कराच्या विमानाने हा स्पाय बलून अटलांटिक महासागरात खाली पाडला.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सांगितले की, हा बलून पाडण्याचा आदेश या आठवड्याच्या सुरुवातीलाच त्यांनी दिला होता. पण तो बलून समुद्रावर येण्याची वाट पाहिली गेली. आणि हा बलून समुद्रावर आल्यावर लगेचच अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी ही कामगिरी पार पाडली.

गेले काही दिवस हा बलून अमेरिकेच्या आसमंतात दिसून येत होता. त्या बलूनच्या हालचालीवर अमेरिकन लष्कराचे बारीक लक्ष होते. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावरही हा बलून पाडण्यासाठी अमेरिकेतून दबाव वाढत होता. त्यातून त्यांनी आदेश दिले आणि अखेर अमेरिकेने हा बलून पाडला आहे.

Chinese Spy Balloon
Pakistan: 'लघवी येणचं बंद झालं, भारताला धमकी देणाऱ्या PAK च्या मंत्र्याची दयनीय अवस्था

अमेरिका, कॅनडा आणि लॅटिन अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात चीनचे संशयित स्पाय बलून दिसू लागल्यानंतर खळबळ उडाली होती. अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉनच्या म्हणण्यानुसार, मोंटानावर दिसलेला फुगा तीन बस इतक्या मोठ्या आकाराचा होता.

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने या स्पाय बलूनपासून नागरिकांना कोणताही धोका नसल्याचे सांगितले होते. पण तरीही अमेरिकन हवाई क्षेत्रात दिसणारा हा बलून गेल्या काही दिवसांपासून ट्रॅक केला जात होता. अमेरिकन लष्करी विमानांद्वारेही त्यावर लक्ष ठेवले जात होते.

ज्या मोटाना भागात तो स्पाय बलून उडत होता, त्या भागात अमेरिकेचे आण्विक क्षेपणास्त्र क्षेत्र आहे. स्पाय बलून त्या संवेदनशील भागातून जाईल आणि चीनला अनेक महत्त्वाची माहिती पोहोचवेल, असा संशय अमेरिकन लष्कराला होता.

मात्र त्या फुग्याचा आकार खूप मोठा असल्याने ढिगारा खाली पडण्याची भीतीही होती, त्यामुळे निर्णय घेण्यास विलंब झाला. रविवारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बलून पाडण्यास ग्रीन सिग्नल दिला आणि हा बलून लोकवस्तीत पडू नये म्हणून समुद्रात पाडण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com