Captain Smit Machchhar FlyDubai hero pilot  Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: "तो आमचा हिरो''! स्मित मच्छार यांच्यासाठी इस्त्रायली गायकानं गायली हनुमान चालीसा; यूजर्स म्हणाले, 'अंगावर शहारे आले...'

Ben Raivitz Israeli Singer Hanuman Chalisa: इस्रायली गायक बेन रॅविट्ज यांनी हनुमान चालीसा गाऊन कॅप्टन स्मितला समर्पित केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हारल होत आहे.

Manish Jadhav

Ben Raivitz Israeli Singer Hanuman Chalisa: फ्लाईदुबईच्या विमानातील भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या अदम्य साहसामुळे केवळ शेकडो प्रवाशांचे प्राणच वाचले नाहीत, तर सांस्कृतिक सीमा ओलांडून या घटनेने एका अनोख्या मानवंदनेचे रुप घेतले. इस्रायली गायक बेन रॅविट्ज यांनी हनुमान चालीसा गाऊन कॅप्टन स्मितला समर्पित केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हारल होत आहे. आतापर्यंत 4 दशलक्ष म्हणजेच 40 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून, युजर्स "हे ऐकून अंगावर काटा आला," अशा प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @ben_raivitzmusic या हँडलवरुन शेअर करण्यात आला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "कॅप्टन स्मित मच्छार हे एक भारतीय नायक आहेत, ज्यांनी शेकडो जीव वाचवले आणि एक मोठी दुर्घटना टाळली. मी हे पठण त्यांना समर्पित करु इच्छितो आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी कामना करतो."

ही थरारक घटना 30 सप्टेंबर रोजी घडली. फ्लाईदुबईचे विमान क्रमांक FZ1073 दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जात होते. त्याचवेळी कॉकपिटमध्ये ओमानी को-पायलटने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेले असतानाही कॅप्टनने हार मानली नाही. कठीण परिस्थीतीतही त्यांनी हनुमान चालीसाचा जप केला, ज्यामुळे त्यांना मानसिक ताकद मिळाली. त्यांनी कसाबसा कॉकपिटचा दरवाजा उघडला, प्रवाशांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि विमान सौदी अरेबियाच्या ताबूक विमानतळावर सुखरुप उतरवले. या धाडसामुळे विमानात असलेल्या 27 बालकांसह तब्बल 174 प्रवाशांचे प्राण वाचले.

कॅप्टन स्मित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलताना सांगितले की, "जेव्हा जेव्हा संकट येते, तेव्हा मी हनुमान चालीसाचे पठण करतो. त्यावेळीही मी सतत हनुमान चालीसाचे पठण करत होतो. देवानेच माझा जीव वाचवला." पंतप्रधानांनी त्यांच्या या शौर्याची प्रशंसा केली.

कॅप्टन स्मित यांच्या या संघर्षाने प्रभावित होऊन इस्रायली गायक बेन रॅविट्ज यांनी हनुमान चालीसा रेकॉर्ड केली. भारतीय शास्त्रीय संगीताची आवड असणारे रॅविट्ज यांनी इन्स्टाग्रामवर (Instagram) लिहिले की, "कॅप्टन स्मित यांनी प्रवाशांचे प्राण वाचवून जी आपत्ती टाळली, त्याला सलाम करण्यासाठी मी हे गाणे समर्पित करत आहे."

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कमेंट्सचा पाऊस पडला. एका युजरने लिहिले, "तुमचा आवाज अतिशय सुंदर आहे... ऐकून अंगावर काटा आला... भारताकडून तुम्हाला प्रेम आणि सन्मान." अनेकांनी त्यांच्या उच्चारांचे आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या सुरांचे कौतुक केले. कॅप्टन स्मित मच्छार सध्या युएईमध्ये उपचार घेत असून त्यांच्या शौर्याची प्रशंसा भारत, इस्रायलसह जगभरात होत आहे. इस्रायल सरकारतर्फे त्यांना ‘सिव्हिलियन हिरोइज्म अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: गोव्यात ज्येष्ठ नागरिकाला 2.83 लाखांचा गंडा; भीती दाखवून बँक खात्यातून रक्कम लंपास, सायबर क्राईम पोलिस ठाण्यात FIR दाखल

Navratri Wishes In Marathi: नऊ दिवस, नऊ रंग अन् देवीच्या भक्तीचा सोहळा! शारदीय नवरात्रीनिमित्त WhatsApp स्टेटस, Facebook पोस्टसाठी खास मराठमोळ्या शुभेच्छा

Crime News: गोपाळ नाईक हाच सूत्रधार की पडद्यामागे आणखी कोणी? श्रीनिवास नायक गोळीबारप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू

Indian Super League: घरच्या मैदानावर विजयाचे लक्ष्य! गौरमांगी सिंग यांच्या नेतृत्वाखाली एफसी गोवा चेन्नईयीनविरुद्ध भिडणार

Ranji Trophy Cricket: गोव्याच्या रणजी संघाची धुरा अभिनव तेजराणाकडे; शिवेंद्र भुजबळला पदार्पणाची संधी, ऋत्विकचे पुनरागमन

SCROLL FOR NEXT