Cancer treatment In Seven Minutes Dainik Gomantak
ग्लोबल

Cancer Treatment: आता सात मिनिटांत होणार कॅन्सरवर उपचार, जगातील पहिलाच प्रयोग रुग्णांसाठी ठरणार वरदान

Cancer Treatment: हे एक इम्युनोथेरपी औषध आहे, जे रुग्णाची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि कर्करोगाच्या पेशी शोधून नष्ट करण्यास मदत करते.

Ashutosh Masgaunde

Cancer treatment will now be done in seven minutes, the world's first experiment in Britain:

इंग्लंडची नॅशनल हेल्थ सर्व्हिस जगातील अशी पहिली वैद्यकीय संस्था ठरणार आहे, जी कर्करोगाच्या रुग्णांवर अवघ्या सात मिनिटांत उपचार पूर्ण करणार आहे. यामुळे उपचारासाठी लागणारा वेळ तीन-चतुर्थांश पर्यंत कमी होऊ शकतो.

नॅशनल हेल्थ सर्व्हिसने सांगितले की, इंग्लंडमध्ये एटेझोलिझुमॅबचा उपचार सुरू करणार्‍या सुमारे ३,६०० रूग्णांपैकी बहुतेक रुग्ण वेळ वाचवणासाठी या नव्या उपचार पद्धतीकडे वळतील.

ब्रिटीश मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (MHRA) याला मान्यता दिली आहे. मंजुरीनंतर, एनएचएस सांगितले की, इम्युनोथेरपी, एटेझोलिझुमॅब यावर उपचार घेत असलेल्या शेकडो रुग्णांना त्वचेखाली इंजेक्शन दिले जाईल. यामुळे चांगले परिणाम मिळतील आणि कर्करोगाच्या उपचाराचा वेळ कमी होईल

नॅशनल हेल्थ सर्व्हिस फाउंडेशन ट्रस्टचे डॉक्टर अलेक्झांडर मार्टिन, म्हणाले, “या मंजुरीमुळे आम्हाला फक्त रूग्णांची काळजी घेण्यास नव्हे तर दिवसभरात अधिक रूग्णांवर उपचार करण्यास देखील मदत होईल.

इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने अहवाल दिला की एटेझोलिझुमॅब, ज्याला टेसेंट्रिक देखील म्हणतात. टेसेंट्रिक हा एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे जो कर्करोगाच्या रूग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यपद्धतीवर परिणाम करतो.

हे औषध सहसा रूग्णांना त्यांच्या शिरामध्ये थेट ड्रिपद्वारे दिले जाते. जेव्हा शिरा ओळखणे कठीण होते तेव्हा त्रास होतो. अशा परिस्थितीत रुग्णांना सलाइन लावल्यानंंतर सुमारे 30 मिनिटे किंवा एक तासाचा कालावधी लागतो.

रोश प्रोडक्ट्स लिमिटेडचे ​​वैद्यकीय संचालक मारियस शॉल्झ म्हणतात की, कर्करोगाच्या रुग्णाच्या शिरामध्ये औषध सोडण्यास आधी 30 ते 60 मिनिटांचा वेळ लागायचा. मात्र, आता या नव्या इंजेक्शनमुळे फक्त सात 7 मिनिटे लागतात. आ

Atezolizumab हे औषध Roche (ROG.S) कंपनीने बनवले आहे. हे एक इम्युनोथेरपी औषध आहे, जे रुग्णाची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि कर्करोगाच्या पेशी शोधून नष्ट करण्यास मदत करते. हे सध्या फुफ्फुस, स्तन आणि यकृत यासह विविध प्रकारचे कर्करोग असलेल्या रूग्णांवर वापरले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT