पत्नीच्या मानलेल्या भावाचे रिक्षाचालकाने केले चार तुकडे, आधी विळ्याने वार अन्...

शेखने इश्वरवर विळ्याने वार केले. त्यानंतर शेख ईश्वरच्या डोक्यावर हातोड्याने मारत राहिला व पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने इश्वरच्या शरीराचे चार तुकडे केले.
Mumbai Auto Rickshaw Driver Chopped 17 years old into Four Pieces.
Mumbai Auto Rickshaw Driver Chopped 17 years old into Four Pieces.Dainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Auto Rickshaw Driver Chopped 17 years old into Four Pieces:

एका 33 वर्षीय रिक्षा चालकाला बुधवारी 17 वर्षीय तरुणाची हत्या, करत मृतदेहाचे चार तुकडे केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. हत्या झालेल्या तरुणाला आरोपीची पत्नी भाऊ मानत होती.

आपल्या पत्नी आणि बहिणीबद्दल अश्लील बोलल्याबद्दल आरोपी शफीक अहमद शेख याने तरुणाची हत्या केली असे, पोलिसांनी सांगितले.

आरोपीला अटक केल्यानंतर चेंबूरच्या आरसीएफ म्हाडा परिसरातील शेख यांच्या दोन खोल्यांच्या फ्लॅटच्या स्वयंपाक घरात तरुणाचा मृतदेह सापडला.

आरसीएफ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित ईश्वर हा शेख आणि त्याच्या पत्नीना खूप दिवसांपासून ओळखत होता. शेख यांची पत्नी आणि तिची बहीण ईश्वर याला भाऊ मानायच्या.

शेख यांनी अनेकदा ईश्वरने पत्नी आणि मेहुणीबद्दल केलेल्या टिप्पण्यांवर आक्षेप घ्यायचा. तरीही ईश्वरने हे थांबवले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सोमवारी शेख याने ईश्वरला आपल्या फ्लॅटमध्ये नेऊन विळ्याने वार करून खून केला आणि नंतर मृतदेहाचे चार तुकडे केले.

ईश्वर बेपत्ता झाल्यानंतर शेखच्या सासऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या हत्येप्रकरणी शेखवर संशय आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली त्यावेळी त्याने हत्येची कबुली दिली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai Auto Rickshaw Driver Chopped 17 years old into Four Pieces.
Viral Video: बंगळुरूमध्ये चाललंय काय? ISRO च्या शास्त्रज्ञांवर दिवसाढवळ्या हल्ले

अशी केली हत्या

मृत तरुणाला शेखची पत्नी भाऊ मानायचीय. शेखने ईश्वरची 28 ऑगस्ट रोजी हत्या केली. शेखने ईश्वरवर विळ्याने वार केले. त्यानंतर शेख ईश्वरच्या डोक्यावर हातोड्याने मारत राहिला. गुन्ह्यात वापरलेला विळा आणि हातोडा आम्ही जप्त केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai Auto Rickshaw Driver Chopped 17 years old into Four Pieces.
गृहिणींच्या कामाला पैशात मोजता येणार नाही: हायकोर्ट

यापूर्वीही हत्येचा आरोप

शेख पूर्वी उरणमध्ये राहत होता. त्याला यापूर्वी २०१३ मध्ये उरणमध्ये नारायण कोळी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. या खटल्यात त्याला अनेक वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. 2013 च्या हत्येतून निर्दोष सुटल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

हत्या झालेला तरुणही सराईत गुन्हेगार होता. त्याला 2020 मध्ये घर फोडल्याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि डोंगरी बालगृहात पाठवले होते, असे पोलिसांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com