Canada Shooting Dainik Gomantak
ग्लोबल

Canada Shooting: कॅनडात रक्तरंजित थरार! शॉपिंग स्टोअरबाहेर भारतीय वंशाच्या जोडप्याची हत्या; परदेशात भारतीयांवर हल्ल्यांचे सत्र सुरुच

Indian Origin Couple Shot Dead In Canada: कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरात एका वॉलमार्ट स्टोअरबाहेर झालेल्या गोळीबारात भारतीय वंशाच्या एका जोडप्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

Manish Jadhav

Indian Origin Couple Shot Dead In Canada: कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरात एका वॉलमार्ट स्टोअरबाहेर झालेल्या गोळीबारात भारतीय वंशाच्या एका जोडप्याचा दुर्देवी मृत्यू झाला. हा पूर्वनियोजित हल्ला असून, यामागे संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा हात असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला. 23 वर्षीय गगनप्रीत रेहल आणि 24 वर्षीय सुखजीत कौर अशी मृतांची ओळख पटली असून, दोघेही जवळच्याच डेल्टा टाउनशिपचे रहिवासी होते.

15 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास स्टोअरच्या पार्किंगमध्ये दोघेही गोळ्या लागलेल्या अवस्थेत आढळून आले. सरे पोलिस सर्व्हिसच्या माहितीनुसार, आपत्कालीन पथकाने रुग्णालयात नेण्यापूर्वी त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, मात्र उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास आता ‘इंटीग्रेटेड होमिसाइड इन्व्हेस्टिगेशन टीम’कडे सोपवण्यात आला.

या जोडप्याला जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचा आणि त्यांचा संघटित गुन्हेगारीशी संबंध असल्याचा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. गोळीबारानंतर अवघ्या तेरा मिनिटांत एका वाहनाला आग लागल्याची घटना घडली असून, त्या जळालेल्या गाडीचा या हल्ल्याशी संबंध आहे का, याचाही तपास सुरु आहे.

घटनास्थळी काचेच्या खिडक्या फुटलेली एक लाल कार आढळून आल्याचे वृत्त आहे. रेहल याचा यापूर्वी शस्त्रांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये पोलिसांशी (Police) संबंध आला होता, तर कौर हिचा कॅनडातील संपर्क मर्यादित होता. परिसरातील सीसीटीव्ही आणि डॅशकॅम फुटेज पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, 29 ऑक्टोबर रोजी लँगली येथे जळालेल्या कारमध्ये सरे येथील 25 वर्षीय भारतीय नागरिक तुषार शर्मा याचा मृतदेह सापडला होता. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या शर्माच्या हत्येचा तपासही सुरु असून, या दोन्ही घटनांच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिस सर्व बाजूंनी कसून चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtrian Shepu Bhaji: शेपू आवडतो की नावडतो? या भाजीच्या प्रेमात पडाल, अशी आहे चवीची भन्नाट कहाणी

Gossip Culture: गॉसिप्स अर्थात रिकामटेकड्यांच्या उचापती; गोड बोलून गुपिते काढणाऱ्यांपासून सावध राहा!

'आता उठवू सारे रान...' मुलांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्याची वेळ आली!

Women Under 23 Cricket: 54 धावांत गोव्याचा डाव आटोपला; बडोद्याकडून 95 धावांनी पराभव, स्पर्धेतील आव्हान संपले

Sudin Dhavalikar Birthday: सुदिन ढवळीकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; देवदर्शन आणि साधेपणाने साजरा केला वाढदिवस

SCROLL FOR NEXT